टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १७ सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉस १७ हा सिझन चांगलाच गाजला आणि आता सीझनचा विजेता कोण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सिझन आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या शो कडे बारकाईने लागले आहे. कालच्या भागामध्ये बिग बॉसने स्पर्धकांचे स्वतःचे जर्नी व्हिडीओ दाखवले. यामध्ये त्यांनी स्पर्धकांचा संपूर्ण प्रवास दाखवला आहे.
बिग बॉस १७ चा विलेन अभिषेक?
सर्वात आधी अभिषेक कुमारचा व्हिडीओ दाखवण्यात आला आणि यावेळी बिग बॉस म्हणाले की, एकदा चित्रपट हिट होण्यासाठी त्यामध्ये हिरो, कॉमेडियन आणि हिरोईनची गरज असते परंतु चित्रपट सुपरहिट होण्यासाठी चित्रपटामध्ये मजबूत विलेन सुद्धा तेव्हढाच महत्वाचा असतो. असे असल्यास मग जर बिग बॉस १७ विलेन अभिषेक कुमार आहे तर मग बिग बॉस १७ चा हिरो कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे खेळाडू टॉप ३ मध्ये
बिग बॉस १७ चा फिनाले २ दिवसावर आहे आणि आता घरामध्ये फक्त पाच खेळाडू आहेत. मागील आठवड्यामध्ये ईशा मालवीय आणि आयेशा खान हिला काढण्यात आले आहे. त्यानंतर टॉप ५ च्या शर्यतीतून अंकिता लोखंडेचा पती विकी जैन याला सुद्धा काढण्यात आले. सध्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेवरून असे लक्षात येत आहे की अभिषेक कुमार, मुनावर फारुकी आणि मनारा चोप्रा हे टॉप ३ मध्ये असण्याची शक्यता आहे.