मुंबई : अभिनेत्री नरगिस फाखरी (Nargis Fakhri) हिचा सायकल चालवताना अनोखा अंदाज तिच्या चाहत्यांना पाहिला मिळाला. पण यातच नरगिसचा अपघात झाला अन् ती सायकलवरून पडली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
नरगिस सायकलिंग करताना दिसत आहे. ती एका नव्या अंदाजात पाहिला मिळाली. ती सायकल चालवताना मागे वळून पाहते तेव्हा तिचा तोल जातो आणि ती सायकलवरून खाली पडते. जरी ती सायकलवरून पडली तरी तिला कोणतीही गंभीर जखम मात्र झाली नाही. तिला किरकोळ दुखापत झाली.