सौजन्य - सोशल मीडिया
Farzi 2 Bhuvan Arora Confirms : दिग्दर्शक राज आणि डीके यांनी आपल्या दमदार कलाकृतीच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘फर्जी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शक राज आणि डीकेला प्रसिद्धी मिळाली आहे. सध्या ही जोडी ‘फर्जी’ सीरिजमुळे चर्चेत आली आहे. ‘फर्जी’ सीरिजला तुफान लोकप्रियता मिळाल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती ‘फर्जी २’ची. शाहिद कपूर आणि भुवन अरोरा हे दोघेही या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत आहे.
हे देखील वाचा – राष्ट्रीय पुरस्कार विजेता डीएसपीचा भारत दौरा, हैदराबाद नंतर कोणत्या शहरात जाणार ?
जानेवारी २०२३ मध्ये ॲमेझोन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या ह्या सीरिजचा आता लवकरच दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती अभिनेता भुवन अरोराने एका मुलाखतीत दिली आहे. नुकतंच अभिनेत्याने डिजिटल कमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “वेब सीरिजचे प्री- प्रोडक्शनवर काम सुरू आहे. प्रेक्षकांच्या भेटीला ‘फर्जी २’ नक्कीच येणार आहे. लेखकांकडून कथानकाच काम सुरू आहे. अद्याप सीरिजची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण मला तरी असं वाटतंय की आम्ही ‘फर्जी २’ घेऊन येत आहोत. सध्या प्रत्येक जण आपआपल्या कामात व्यस्त आहेत. लवकरच तुम्हाला अधिकृत माहिती मिळेल.”
या लोकप्रिय वेबसीरीजचे दिग्दर्शन राज आणि डिकेने केले असून प्रमुख भूमिकेत शाहीद कपूर, भुवन अरोरा, विजय सेथुपति, के.के.मेनन आणि राशी खन्ना आहे. दरम्यान या सीरीजचे कथानक दोन कलाकारांबद्दलची आहे. ते पेशाने डिझायनर असतात. पण ते त्यांची कला अशा चुकीच्या पद्धतीने वापरतात आणि कोट्यवधींचा बिझनेस करतात. पेपरच्या प्रिटिंग हाऊसमध्ये शाहीद आणि भुवन दोघंही खोट्या नोटा बनवण्याचा धंदाच सुरुवात करतात. हळूहळू त्यांचा तो धंदा चांगलीच उसळी घेतो. पण शेवटी ते दोघंही पकडली जाण्याची शक्यता असते. पण ते काही पकडले जात नाहीत.
हे देखील वाचा – राजकुमार रावच्या पहिल्या चित्रपटाची किती होती? अभिनेता आज आहे कोट्यवधींचा मालक
आता दुसऱ्या सीझनमध्ये शाहीद आणि त्याचा मित्र खोट्या नोटा बनवण्याचा धंद्यात तुरूंगाची हवा खाणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांना अजुन तरी ‘फर्जी २’ची वाट पाहावी लागणार आहे.