बुलावेयोमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारत अडचणीत(फोटो-सोशल मीडिया)
IND vs PAK, Under-19 World Cup Live : १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारताच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अवघ्या १० षटकात भारताने ८.१ षटकातच ४७ धावांवरच आपले महत्वाचे ३ फलंदाज गमावले आहेत. पाकिस्तानकडून मोहम्मद सय्यमने दोन विकेट्स काढल्या आहेत.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. भारताकडून आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीने डावाची सुरुवात केले. या दोघांनी ७.४ षटकापर्यंत ४७ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर मात्र भारताची घसरगुंडी उडाली. भारताचे८.१ षटकातच ४७ धावांवरच महत्वाचे ३ फलंदाज माघारी गेले. आरोन जॉर्ज १६ धावा करून बाद झाला. त्याला अब्दुल सुभानने बाद केले, त्यानंतर मैदानात आलेला भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे भोपळा न फोडताच माघारी गेला. त्याला मोहम्मद सय्यमने आपली शिकार बनवले. एका टोकाला डाव सांभाळत असलेला वैभव सूर्यवंशी मोठी खेळी करेल असे वाटत असताना मात्र २२ चेंडूत ३० धावा करत बाद झाला, त्याल देखील मोहम्मद सय्यमने बाद केले.
भारताच्या १४.३ षटकात ७३ धावा झाल्या असून वेदांत त्रिपाठी १५ तर विहान मल्होत्रा ७ धावांवर खेळत आहे. या दोन फलंदाजांना मैदानावर टिकून राहावे लागेल तरच भारताला या संकटातून बाहेर पडता येऊन मोठी धावसंख्या उभी करता येईल. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे. आजचा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.
पाकिस्तान U19 प्लेइंग इलेव्हन: हमजा जहूर (w), समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसफ (c), हुजैफा अहसान, अली हसन बलोच, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा
भारत अंडर 19 प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (क), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यू), वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन






