पोलिसांनी याप्रकरणी प्रथम कुऱ्हे, विकास खंदारे व अरबाज या तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार रेल्वे स्टेशन परिसरात दुपारच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी घडला. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. किरकोळ वादातून झालेल्या भांडणातून आदित्यला तीन युवकांनी धारदार खंजिराने त्याच्यावर वार केले. त्याच्या पोटात खंजीराने सपासप वार केले. त्यातीलच एका युवकाने दगडाने देखील गंभीर मारहाण केली आहे. या हल्यात आदित्य सूर्यवंशी हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण करण्यात येत आहे.
69 वर्षीय नराधमाने चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार, आधी चॉकलेट आणि पैसे दिले नंतर…
हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. हिंगोलीतील एका ६९ वर्षीय पुरुषाने ९ वर्षीय मुलीला चॉकलेट खायला देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने हिंगोलीत खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा कसा उलगडा झाला आणि काय घडलं नेमकं? जाणून घ्या.
काय घडलं नेमकं?
अल्पवयीन पीडितेच्या पालक आरोपीच्या शेतात रोजंदारीवर काम करतात. २८ तारखेला सकाळी ९ वर्षीय चिमुकली शाळेत जात होती. त्यावेळी नराधम आरोपीने तिला एकटी जाताना पाहून तिला काही चॉकलेट आणि पैसे दिले. एवढेच नाही तर तिला घरी येण्यास सांगितले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर चिमुकली घाबरली. त्यानंतर चिमुकलीने तिच्या आईला तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला. तिच्यासोबत घडलेला प्रकार ऐकून आई घाबरली.
आरोपी अटकेत
चिमुकलीच्या आईने हा सगळा प्रकार मुलीच्या वडिलांना सांगितलं. त्यांनतर मुलीच्या कुटुंबाने काल रात्री कळमनुरी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. चिमुकलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीचे नाव संतुकराव आवटे (६९) असे आहे. आरोपी विरुद्ध पोक्सो आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Ans: हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशनसमोर भरदिवसा ही घटना घडली.
Ans: किरकोळ वादातून तिघांनी मिळून युवकावर खंजिराने आणि दगडाने हल्ला केला.
Ans: तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.






