• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Ratnagiri Big Blow To Mahavikas Aghadi Key Office Bearers Of Congress Thackeray Group Join Bjp

Ratnagiri : महाविकास आघाडीचा मोठा धक्का ; काँग्रेस,ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 01, 2026 | 02:41 PM
Ratnagiri : महाविकास आघाडीचा मोठा धक्का ; काँग्रेस,ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाविकास आघाडीचा मोठा धक्का
  • काँग्रेस,ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
चिपळूण : चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चिपळूणमधील काँग्रेस व शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशकर्त्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपात नक्कीच मान- सन्मान ठेवला जाईल, अशी ग्वाही प्रशांत यादव यांनी यावेळी दिली. हा छोटेखानी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी शनिवारी सकाळी झाला.

हा पक्षप्रवेश दिनांक 28 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित होणाऱ्या महायुतीच्या प्रचार सभेत होणार होता. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा व प्रचार सभा रद्द झाल्याने हा पक्षप्रवेश कार्यक्रम शनिवारी खेर्डी येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भाजपातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर भाजप नेते प्रशांत यादव, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सौ. स्वप्ना यादव, भाजपा चिपळूण ग्रामीण मंडळ अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक शशिकांत मोदी, उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष लियाकत शाह, शिवसेना उबाठा चिपळूण उपशहरप्रमुख समीर टाकळे, महिला आघाडी विधानसभा क्षेत्राध्यक्षा सौ. स्वाती देवळेकर, काँग्रेसचे अल्पसंख्यांक चिपळूण तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्षा प्रणिता घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे चिपळूण शहर उपाध्यक्ष मुक्तार आदमखान पठाण, मन्सूर घारे, सज्जाद शेख, सुफियान कादिरी आदींनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे भाजपा नेते व पदाधिकाऱ्यांनी भाजपात स्वागत केले.

Ratnagiri News: राजापुरात ५१ ग्रा.पं. वर नेमणार प्रशासक; सरपंच संघटनेकडूनही ठराव पारीत

 

कार्यकर्त्यांसाठी भाजप प्रवेश- प्रशांत यादव

प्रशांत यादव यांनी भाजप पक्ष प्रवेशासंदर्भातील आढावा घेताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून आपला मुंबई हजारो समर्थकांसमवेत भाजपा पक्षात प्रवेश झाला. कार्यकर्त्यांसाठी निर्णय करायचा असतो. कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जायचे आहे. यातून आपण भाजपात प्रवेश केला, असल्याचे यादव यांनी यावेळी नमूद केले.

भाजपा नेतृत्वाने आपल्यावर दाखवला विश्वास

ते आणखी पुढे म्हणाले की, भाजपात प्रवेश केल्यानंतर आपल्याला चिपळूण नगर परिषद निवडणुकीत प्रभारी पदाची जबाबदारी मिळाली. उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोठे सहकार्य मिळाले. निवडणूक प्रक्रियेत भाजप उमेदवारांच्या पाठीशी वरिष्ठ नेते खंबीरपणे उभे राहिले. भाजपात काम करीत असताना निवडणूक संचलन, टीमवर्क यासारख्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या. यातून भाजपाचे ७ नगरसेवक निवडून आले. भाजपा पक्षात ‘व्हिजन’ आहे. भविष्यातील भारत घडवायचा आहे. भाजप पक्षात सक्षम नेतृत्वाला पाठबळ देऊन मोठे केले जाते. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांमध्ये मुस्लिम समाजाला प्राधान्य देण्याचे काम झालेले आहे, असे प्रशांत यादव यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे!

पक्ष सक्षम नेतृत्व, चांगले कार्यकर्ते तसेच कार्यकर्त्यांना योग्य ठिकाणी योग्य संधी दिल्यानंतर मोठा होतो. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. यामुळे आपण ज्या पक्षात आलो आहे, त्या पक्षात दिवस- रात्र काम करण्याचा आनंद मिळतो, मिळत आहे, अशी भावना देखील प्रशांत यादव यांनी यावेळी व्यक्त केली. ते आणखी पुढे म्हणाले की, भाजपा पक्षात नव्याने प्रवेशकर्ते पदाधिकारी यांच्याशी आपले पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत. या प्रवेशकर्त्या पदाधिकाऱ्यांचा भाजपा पक्षात मान- सन्मान ठेवला जाईल, अशी ग्वाही प्रशांत यादव यांनी यावेळी दिली. आता आपण सर्वांनी पक्षाची ठाम भूमिका जनतेपर्यंत पोहोचवूया. पक्ष आणखी बळकट करूया, सर्व समाजाला न्याय वाटेल, अशा पद्धतीने काम करूया असे आवाहन शेवटी यादव यांनी यावेळी केले.

ZP Election 2026: खेडात ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात; अनेक उमेदवारांचे अर्ज

आपल्या विश्वासाला तडा जाऊ दिली जाणार नाही- सतीश मोरे

भाजपा उत्तर त्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी आपल्या मनोगतात प्रवेशकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, आपण भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, माजी आ. डॉ. विनय नातू, चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप पक्ष प्रवेश केला आहे. आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिली जाणार नाही. आपण सर्वांनी जे स्वप्न पाहिले आहे, ते प्रशांत यादव यांना भविष्यात विधानसभेवर पाठवून पूर्ण करूया, असे आवाहन मोरे यांनी यावेळी केले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची प्रवेशकर्त्यांची लवकरच भेट घडवून आणू, असा शब्द यावेळी प्रवेशकर्त्यांना मोरे यांनी यावेळी दिला. जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे यांनी आपण भाजपा पक्षात प्रवेश केल्यापासून आपल्यासह सर्वांनाच मानसन्मान मिळत आहे. भाजपा हा फक्त परिवार नसून कौटुंबिक परिवार आहे, अशी भावना मांडली.

यादव दाम्पत्य आमच्यासाठी भाऊ-बहीण- शशिकांत मोदी

भाजपा चिपळूण शहर मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक शशिकांत मोदी यांनी भाजपा पक्षात प्रवेश केल्यानंतर थोडा त्रास झाला. मात्र, पक्ष नेतृत्व पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आपण प्रत्येकाने पक्ष वाढीसाठी वेळ दिला पाहिजे. विशेष म्हणजे चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात भाजप नेते प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांच्यामुळे भाजपाला आणखी बळ मिळाले आहे. यादव भाऊ आहेत तर सौ. स्वप्ना या आम्हाला बहीण मिळाली आहे, अशा शब्दात यादव दांपत्यांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. तर प्रवेशकर्ते लियाकत शाह यांनी भाजप पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशी ग्वाही दिली तसेच स्वाती देवळेकर यांनी पूर्वीचा पक्ष सोडताना वेदना होत आहेत. मात्र, आपण विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, असे सांगितले. प्रणिता घाडगे यांनी देखील आपले मनोगत मांडले.

यावेळी नगरसेवक संदीप भिसे, शुभम पिसे, नगरसेविका सौ. अंजली कदम, सौ. वैशाली निमकर, माजी नगरसेवक आशिष खातू, सारिका भावे, संदीप सुखदरे, माजी नगरसेवक विजय चितळे, जतीन घटे, अभय चितळे, महेश कांबळी, दिनेश लटके, जगदीश गोरिवले, स्वानंद रानडे, मोहन मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri big blow to mahavikas aghadi key office bearers of congress thackeray group join bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Nationalist Congress Party
  • political news
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा
1

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

‘सुनेत्राताईंचे दु:ख खूप मोठे, पण त्यांनी…’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
2

‘सुनेत्राताईंचे दु:ख खूप मोठे, पण त्यांनी…’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन
3

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

‘मी Sunetra Ajit Pawar शपथ घेते की..’; ऐतिहासिक क्षण! राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
4

‘मी Sunetra Ajit Pawar शपथ घेते की..’; ऐतिहासिक क्षण! राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune News : जिल्हा परिषद निवडणुकीची पुरंदर तालुक्यात रणधुमाळी ; बंडखोरी, पक्षांतरांनी ढवळली राजकीय समीकरणं

Pune News : जिल्हा परिषद निवडणुकीची पुरंदर तालुक्यात रणधुमाळी ; बंडखोरी, पक्षांतरांनी ढवळली राजकीय समीकरणं

Feb 01, 2026 | 04:08 PM
DC vs UPW,WPL 2026 : DC आणि UPW मध्ये रंगणार घमासान! जेमिमाह आर्मीला एलिमिनेटरमध्ये स्थान पटकावण्यासाठी विजय आवश्यक 

DC vs UPW,WPL 2026 : DC आणि UPW मध्ये रंगणार घमासान! जेमिमाह आर्मीला एलिमिनेटरमध्ये स्थान पटकावण्यासाठी विजय आवश्यक 

Feb 01, 2026 | 04:07 PM
Union Budget 2026 : देशात २० नवीन जलमार्गांची घोषण, या शहरांमध्ये होणार सेवा सुरु

Union Budget 2026 : देशात २० नवीन जलमार्गांची घोषण, या शहरांमध्ये होणार सेवा सुरु

Feb 01, 2026 | 04:07 PM
बुलढाणा येथे राज्यस्तरीय शालेय शुटिंगबॉल स्पर्धांचे आयोजन! जिल्हा क्रीडा संकुलात पार पडणार

बुलढाणा येथे राज्यस्तरीय शालेय शुटिंगबॉल स्पर्धांचे आयोजन! जिल्हा क्रीडा संकुलात पार पडणार

Feb 01, 2026 | 04:01 PM
Devendra Fadnavis on NCP Merger:  राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी…; विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीस स्पष्टचं बोलले

Devendra Fadnavis on NCP Merger:  राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी…; विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीस स्पष्टचं बोलले

Feb 01, 2026 | 03:58 PM
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेला ई-केवायसीचा फटका! लाखो महिलांचे हप्ते रखडले; नेमकं कारण काय?

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेला ई-केवायसीचा फटका! लाखो महिलांचे हप्ते रखडले; नेमकं कारण काय?

Feb 01, 2026 | 03:55 PM
UP Crime:  प्रेमाचा शेवट अत्यंत क्रूर, पत्नीनेच पतीचा गळा दाबून केली हत्या;  भयानक कारण समोर

UP Crime: प्रेमाचा शेवट अत्यंत क्रूर, पत्नीनेच पतीचा गळा दाबून केली हत्या; भयानक कारण समोर

Feb 01, 2026 | 03:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 03:49 PM
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.