राजकुमार राव घरासाठी भरतोय EMI, सांगितली खरी परिस्थिती...
‘श्रीकांत’ आणि ‘स्त्री २’ मुळे सर्वाधिक प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेता राजकुमार रावचा आज वाढदिवस आहे. अभिनेता राजकुमार राव आज आपला ४० वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘श्रीकांत’ आणि ‘स्त्री २’ सारख्या सुपर डुपर हिट चित्रपटांमुळे अभिनेता कमालीचा चर्चेत आला आहे. राजकुमारने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्त त्याच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया, त्या शिवाय त्याचा पहिला चित्रपट कोणता ? त्याचं पहिलं मानधन किती ? जाणून घेऊया…
२०१० मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह सेक्स और धोका’ चित्रपटाच्या माध्यमातून राजकुमारने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तो प्रेक्षकांच्या भेटीला ‘रागिनी एमएमस’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर २’, ‘तलाश’, ‘काय पोचे’, ‘क्विन’, ‘सिटीलाईट्स’, ‘ट्रॅप’, ‘न्यूटन’, ‘बरेली की बर्फी’, ‘उमरता’, ‘ शादी मैं जरूर आना’ सह अनेक दमदार सिनेमे अभिनेत्याने प्रेक्षकांना दिले. दरम्यान, त्याची पहिल्या चित्रपटाची फी ११००० रुपये होती. राजकुमारने ‘लव्ह सेक्स और धोका’साठी ११००० रुपये मानधन घेतलं होतं. असं असलं तरीही तो आज करोडोंचा मालक आहे.
राजकुमार रावने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली. राजकुमार सध्या इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध अभिनेता असण्यासोबतच कोट्यवधींचा मालकही आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट ‘स्त्री २’ चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या चित्रपटाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता राजकुमार रावची एकूण संपत्ती ८१ कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार एका चित्रपटासाठी सुमारे ६ कोटी रुपये फी आकारतो. अभिनेता ब्रँड एंडोर्समेंटसाठी सुमारे १ ते २ कोटी रुपये मानधन घेतो. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला ‘स्त्री २’ साठी ६ कोटी रुपये मानधन मिळाले आहेत.
हे देखील वाचा – प्रियंका चोप्रा आणि परिणिती चोप्रात वाद? ‘या’ कारणाची होतेय सोशल मीडियावर चर्चा
राजकुमार पत्नी पत्रलेखा पॉलसोबत एका लक्झरियस अपार्टमेंटमध्ये राहतो. अभिनेत्याने जुहूजवळील अभिनेत्री जान्हवी कपूरचं घर विकत घेतलं आहे. त्याने जान्हवीकडून ४४ कोटी रुपयांना घर विकत घेतले आहे. राजकुमारकडे अनेक लक्झरियस कार्सदेखील आहेत. दरम्यान अभिनेत्याकडे ऑडी Q7 (किंमत 80 लाख), मर्सिडीज-बेंझ सीएलए 200 (किंमत 37.96 लाख) आणि मर्सिडीज-बेंझ जीएलएस (रु. 1.19 कोटी) यांचा समावेश आहे. त्याच्याकडे 18 लाख रुपयांची आलिशान हार्ले डेव्हिडसन फॅट बॉब बाईक सारख्या अलिशान आणि महागड्या कार्स आहेत. राजकुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, राजकुमार लवकरच तृप्ती डिमरीसोबत ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय अभिनेत्याकडे एक ॲक्शन-ड्रामा चित्रपटही आहे. ज्याची घोषणा होणे बाकी आहे.