ज्या तारा वझेच्या आवाजावर लाखो जण फिदा होते तो आवाज खरा ताराचा नसून सावलीचा आहे हे सत्य जेव्हा सारंगला कळालं त्यानंत त्याने सावलीची खरी ओळख सगळ्यांसमोर आणली. कुटुंबाची फसवणूक केल्यामुळे तारा मेहेंदळेंचं घर सोडण्याची शिक्षा दिली गेली. सत्य अनपेक्षितपणे समोर आल्याने तारा आणि भैरवीमध्ये देखील अंतर निर्माण झालं. या सत्याचा उलगडा होत नाही तोच आता ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्व मेहेंदळे कुटुंबासमोर आला.
भर कार्यक्रमातून सावलीचं अपहरण करण्यामागे ऐश्वर्याचा हात होता हे स्वत: ऐश्वर्या कबूल करताना व्हिडीओ भैरवीने सर्वांसमोर आणला. त्याचवेळी रागाचा पारा चढलेल्या तिलोत्तमाने ऐश्वर्याच्या कानाखाली लगावली. फक्त सावलीचं अपहरण केल्याचं ऐश्वर्याने कबूल केलेला व्हिडीओच समोर आला नाही तर आतापर्यंतच्या तिच्या सगळ्या कर्मांचा पाढा वाचला गेला.
मेहेंदळे कुटुंबाला वारस मिळाला यासाठी गेले कित्येक वर्ष प्रयत्न सुरु असतात. मात्र मेहेंदळेंची मोठी सून अमृताला बाळ होता होत नव्हतं याचं कारण म्हणजे ऐश्वर्या खेळत असलेली खेळी. गेली कित्येक वर्ष ऐश्वर्या अमृताला दुधातून एक पावडर देत नाही. तिने असं सांगितलं होतं की, अमृताची तब्येत ठणठणीत रहावी आणि तिला बाळ होण्यासाठी कोणत्याही समस्यांना सामोरं जायला लागू नये म्हणून डॉक्टरांनी हे औषध दिलं आहे. वास्तविक पाहता हे औषध नाही तर, अमृताला कधीही बाळ होऊ नये यासाठी ऐश्वर्या तिला दुधातून एकप्रकारे विषच देत होती.
ऐश्वर्याच्या पापांचा पाढा समजल्यावर तिलोत्तमाचा रागाचा उद्रेक होतो. तू सून नाही घराला लागलेली वाळवी आहेस असं तिलोत्तमा ऐश्वर्याला सुनावते आणि घराबाहेर काढते. हा भाग प्रेक्षकांना येत्या 28-29 जानेवारीला पाहता येणार आहे. मालिकेता प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. आता तरी ऐश्वर्या सुधारणार की पुन्हा नवी खेळी खेळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.






