मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री शहनाज गिलबाबत (Shahnaz Gill) मोठी बातमी समोर येत आहे. शहनाज गिलचे वडील संतोख सिंग यांना पाकिस्तानातुन धमकीचा फोन आला आहे. फोन करणाऱ्याने त्यांना 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख पाकिस्तानी नागरिक असल्याची करून ५० लाख रुपयांची मागणी केली.
[read_also content=”झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टीना पिझकोवानं जिंकला मिस वर्ल्डचा मुकुट! सिनी शेट्टीला आठव्या स्थानावर मानावं लागलं समाधान https://www.navarashtra.com/movies/czech-republics-kristina-pizkova-won-the-miss-world-2024-nrps-514151.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एका पाकिस्तानी नंबरवरून संतोख सिंग यांना धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्याने सांगितले की तुमच्याबद्दल, तुम्ही काय करता… आणि तुम्ही कुठे राहता याची सर्व माहिती आमच्याकडे आहे. तुमच्या मुलीने खूप पैसा कमावला आहे. तुम्ही खाणप्रश्नीही रखडत आहात, जे योग्य नाही. तुम्ही ५० लाख रुपये दिले तर बरे. अन्यथा तुमचीही अवस्था शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यासारखी होईल.
5 नोव्हेंबर 2022 रोजी अमृतसर येथे आंदोलनादरम्यान शिवसेना (तकसाली) नेते सुधीर सुरी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बियास पोलीस ठाण्याचे प्रभारी गुरिंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास चौकशी करू. त्यांनी सांगितले की, संतोख सिंग यांना आधीच सुरक्षा देण्यात आली आहे.
शहनाज गिलचे वडील संतोख सिंग सुख यांनी 24 डिसेंबर 2021 रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये येण्यापूर्वी संतोख सिंह यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवली होती. 2022 मध्येही संतोख सिंग यांना अज्ञात मोबाईल नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. फोन करणाऱ्या आरोपीने दिवाळीपूर्वी जीवे मारण्याची धमकी दिली होती. यापूर्वी २०२१ मध्ये दोन दुचाकीस्वार तरुणांनी त्याच्या कारवर गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.