Adipurush – ‘आदिपुरुष’ हा चित्रपट एकीकडे प्रचंड वादात सापडलेला असताना, दुसरीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोज नवनवे रेकॉर्ड रचत आहे. पहिल्या दिवशी जगभरात 140 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 100 कोटींची कमाई केल्यानंतर आता तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने पुन्हा 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासोबतच चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 340 कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. (om raut) (prabhas) (kriti sanon) (adipurush box office collection)
‘पठाण’चा विक्रम मोडण्यात मात्र अयशस्वी
शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ नंतर अवघ्या 3 दिवसांत 300 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा आदिपुरुष हा दुसरा चित्रपट ठरला आहे. मात्र, या क्लबमध्ये प्रवेश केल्यानंतरही हा चित्रपट ‘पठाण’च्या पहिल्या वीकेंड कलेक्शनचा विक्रम मोडू शकला नाही. पहिल्या वीकेंडमध्ये ‘पठाण’ने जगभरात 351 कोटी रुपयांचे कलेक्शन केले, तर ‘आदिपुरुष’ 11 कोटी रुपयांनी मागे राहिला.
‘KGF 2’ला टाकले मागे
पहिल्या वीकेंड कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट ‘पठाण’च्या मागे पडला पण त्याने ‘KGF 2’ चा रेकॉर्ड नक्कीच मोडला. KGF 2 ने पहिल्या वीकेंडमध्ये 268.63 कोटींची कमाई केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट सर्व वादांना तोंड देत बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड तोडत आहे.
या चित्रपटाविरोधात अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू असूनही आदिपुरूष बॉक्स ऑफीसवर विक्रम रचत आहे. निगेटीव्ह पब्लिसिटीचा चित्रपटाला करोडोंचा फायदा होताना दिसत आहे. 500 कोटीं इतका खर्च करून तयार केलेला या चित्रपटाने पहिल्याच विकेंडला 340 कोटींची कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकिंग हे या कलेक्शनचं कारण आहे. दुसरीकडे, ट्रेड एक्सपर्ट तरण आर्दश यांचे मत आहे की, चित्रपटाच्या जबरदस्त अॅडव्हान्स बुकींगमुळे चित्रपटाच्या कमाईत वाढ दिसून येत आहे.