अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhavan) यांचा भयपट ‘शैतान’ 8 मार्चला म्हणजेच महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केलं आहे. अजय देवगणसह आर माधवनच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. ‘शैतान’ने रिलीज होताच देशभरात बॉक्स ऑफिसवर कब्जा केला असून पहिल्याच दिवशी (Shaitaan Box Office Collection) भरमसाठ कमाई केली आहे.
[read_also content=”‘महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘महादेव’चं मोशन पोस्टर भेटीला, अंकुश चौधरी दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत! https://www.navarashtra.com/movies/on-occasion-of-mahashivratri-ankush-chaudhari-starrer-mahadev-movie-poster-released-nrps-513903.html”]
अजय देवगणचा ‘शैतान’ हा हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पंसतीस उतरला आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकारच्या भुमिकेचं चांगलच कौतुक होत आहे मात्र, आर माधवननं साकारलेला खलनायकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. अॅडवान्स बुकिंगमध्येच ‘शैतान’च्या 1 लाख 76 हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली होती. आता Sacknilk च्या रिपोर्टनुसार, ‘शैतान’ या चित्रपटानं पहिल्याच दिवशी भारतात बॉक्स ऑफिसवर 14.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.
वीकेंडला ‘शैतान’च्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ होऊ शकते, असे ट्रेड पंडितांचे मत आहे. 2024 मध्ये ‘शैतान’ हा अजय देवगणचा पहिला चित्रपट असेल, जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टरचा किताब जिंकू शकेल.