फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री आलिया भटने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियावर होणाऱ्या क्रियांचा चांगलाच पाहुणचार घेतला आहे. मुळात, अभिनेत्रीचे घर सध्या अंडर कंस्ट्रक्शनमध्ये आहे. तिच्या घराचे फोटोज काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले गेले आहे.
याचा चांगलाच समाचार अभिनेत्रीने घेतला आहे. तिचे म्हणणे आहे की असे कोणाच्याही खाजगी वास्तूचे व्हिडीओज काढून सोशल मीडियावर कोणत्याही परवानगीशिवाय शेअर करणे, हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे आणि अतिशय चुकीची बाब आहे.
“मुंबईसारख्या शहरात जागेची टंचाई ही वास्तव गोष्ट आहे. अनेकदा आपल्या खिडकीतून दिसणारा नजारा म्हणजे थेट दुसऱ्याच्या घराचे दृश्य असते. परंतु याचा अर्थ असा नाही की कोणालाही खाजगी घरांचे चित्रीकरण करून ते ऑनलाईन प्रसारित करण्याचा अधिकार मिळतो. आमच्या घराचे जे सध्या बांधकामाधीन आहे असे व्हिडिओ आमच्या परवानगीशिवाय काढले गेले असून, विविध ठिकाणी प्रसारितही झाले आहेत. ही कृती आमच्या गोपनीयतेवर झालेला गंभीर आघात असून, सुरक्षेच्या दृष्टीनेही ती चिंताजनक आहे. कोणत्याही व्यक्तीची संमती न घेता त्यांच्या घराचे फोटो किंवा व्हिडिओ काढणे हे “कंटेंट” नव्हे, तर थेट उल्लंघन आहे. असे वर्तन कधीही योग्य मानता येणार नाही. जरा विचार करा, तुमच्या घराचे आतील भाग कुणी तुमच्या नकळत चित्रित करून सार्वजनिकरित्या प्रसारित केले, तर ते तुम्हाला मान्य होईल का? निश्चितच नाही. हे कोणालाच मान्य होणार नाही. म्हणूनच माझी सर्वांना नम्र पण ठाम विनंती आहे, अशा प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ दिसल्यास ते पुढे शेअर करू नका. तसेच माध्यम क्षेत्रातील मित्रांना मी आवाहन करते, कृपया अशा प्रकारचे कंटेंट त्वरित काढून टाकावे. धन्यवाद.” असे तिने तिच्या पोस्टमध्ये नमूद केले असून सध्या हे फार चर्चेत आहे.
पोस्टखाली नेटकऱ्यांनी तिच्या या मुद्द्याचे समर्थन केले आहे.