Stock Market Today: तेजीत उघडणार आजचा शेअर बाजार... 'हे' स्टॉक्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल
Todays Gold-Silver Price: सोनं-चांदी खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर
शुक्रवारी, भारतीय शेअर बाजाराने तेजी दाखवली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,५०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ३१६.५७ अंकांनी म्हणजेच ०.३८% ने वाढून ८२,८१४.७१ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ११६.९० अंकांनी म्हणजेच ०.४६% ने वाढून २५,५७१.२५ वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ४३२.४५ अंकांनी किंवा ०.७१% ने वाढून ६१,१७२.०० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार आयडीएफसी फर्स्ट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स आणि सेझ, आयसीआयसीआय बँक, हायवे इन्फ्रा, यूपीएल, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ऑलकार्गो टर्मिनल्स, विक्रम सोलर या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच स्टॉक्सची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी शिफारस केलेल्या या स्टॉक्समध्ये वर्धमान टेक्सटाईल्स, एबीएसएलएएमसी, भेल, कमिन्स इंडिया आणि जेएसडब्ल्यू एनर्जी यांचा समावेश आहे.
India Import Saudi Arabia: रशियन तेलाला ब्रेक; सौदी अरेबिया बनला भारताचा सर्वात मोठा पुरवठादार
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारसित केली आहे. यामध्ये बजाज कंझ्युमर केअर, हॅपी फोर्जिंग्ज, यथार्थ हॉस्पिटल आणि ट्रॉमा केअर सर्व्हिसेस, महिंद्रा लॉजिस्टिक्स आणि टोरेंट पॉवर यांचा समावेश आहे. आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांनी पुढील एक ते दोन आठवड्यांसाठी तीन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये आयआरसीटीसी, टाटा केमिकल्स, कोलगेट-पामोलिव्ह (भारत) या स्टॉक्सचा समावेश आहे.






