तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला (Allu Arjun) गुरुवारी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘पुष्पा’ (pushpa) या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. (National Film Award,) यासह अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा तेलुगू सिनेमातील पहिला अभिनेता ( pushpa) ठरला आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यापासून अल्लू अर्जुनच्या घरात जल्लोषाचे वातावरण आहे. या आनंदाच्या प्रसंगी अल्लू अर्जुन आनंदात दिसला. अनेक सेलेब्रिटींनीही त्याच्या घरी जाऊन त्याच अभिनंदन केलं
[read_also content=”असं झाल्यास चांद्रयान-३ चे लँडर-रोव्हर नष्ट होईल….इस्रो प्रमुखांनी व्यक्त केली भिती! https://www.navarashtra.com/india/chandrayaan-3-update-isro-chief-s-somanath-warned-about-vikram-lander-and-pragyan-rover-nrps-449529.html”]
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची कळताच, अल्लू अर्जूनने वडील अल्लू अरविंद यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. त्यानंतर तो वडिलांना मिठी मारताना दिसला. त्यानंतर अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहा रेड्डीला उचलून आनंद व्यक्त केला. अल्लूने आपला आनंद आपल्या मुलांसोबत शेअर केला आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमारही या आनंदात सामील झाले. अल्लू अर्जुनच्या घरी भेट देत त्यांनी त्याच अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर अनेक लोकं अल्लूचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी येत आहेत. याचा एक व्हिडिओही ‘पुष्पा’ या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
??❤️#Pushpa ❤️?#ThaggedheLe pic.twitter.com/BfScr0kgsL — Pushpa (@PushpaMovie) August 24, 2023
‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाने 400 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. फॅन्स हा चित्रपट खूप आवडला होता. त्याचबरोबर ‘पुष्पा : द रुल’ या चित्रपटाचा सिक्वेल तयार होत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत पुन्हा एकदा रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल दिसणार आहेत. ‘पुष्पा: द रुल’ चित्रपटाचे 40 टक्क्यांहून अधिक शूटिंग पूर्ण झाले आहे.