Allu Arjun Birthday : साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन (Allu Arjun). अल्लू अर्जुन 7 एप्रिलला त्याचा वाढदिवस साजरा करतोय. पुष्पा सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीतही अल्लू अर्जुनला डोक्यावर घेतले. अल्लूच्या पुष्पाची स्टाईल, सिनेमातील गाण्यांनी नुसता धुमाकूळ घातला. साऊथ आणि हिंदी पट्ट्यातही या सिनेमाने चांगली कामगिरी केली. बॉक्स ऑफिसवर तर नुसता धमाका या सिनेमाने केला. असं सगळं असलं तरी मात्र, IMDB वर सर्वाधिक रेटिंग असलेला सिनेमा हा पुष्पा नसून वेदम हा तेलुगु सिनेमा आहे.
अल्लू अर्जुनच्या पदार्पणापासूनच्या दोन दशकांमध्ये अल्लू अर्जुनने अने ब्लॉकबस्टर्स सिनेमा दिले. तेलुगुमध्ये सुपरस्टार असेल्या अल्लू अर्जुनचे फॅन फॉलोईंग पुष्पा सिनेमानंतर वाढले हे सुद्धा नाकारता येणार नाही. त्याच्या ‘पुष्पा’ सिनेमाने देशभरात वादळ निर्माण केले. ‘फायर है मे फायर..’ या डायलॉगने तर सोशल मीडियावर अनेक रील्ससुद्धा आली. मात्र, अल्लूची ही किमया खूप आधीपासूनच आहे. आर्य, आलावैकुंठप्रेमुलु आणि पारुगु यांसारख्या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका नेहमीच प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या
एवढंच नाही तर या सिनेमांमधील त्याच्या अभिनयाने समीक्षकांची प्रशंसा तसेच व्यावसायिक यशही मिळवले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अल्लू अर्जून IMDb च्या 2022 च्या टॉप 10 सर्वाधिक लोकप्रिय भारतीय स्टार्समध्ये नवव्या क्रमांकावर होता – जगभरातील 200 दशलक्षाहून अधिक मासिकं आणि दृश्यांच्या आधारावर ही यादी करण्यात आली होती. IMDB वर अल्लू अर्जुनचा सर्वाधिक रेटिंग असणारा सिनेमा आहे वेदम, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे आर्य.. आणि अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर आहे पुष्पा..
IMDb वर अल्लू अर्जुनचे 10 सर्वाधिक रेट केलेले सिनेमा
1. वेदम – 8.1
2. आर्य – 7.8
3. पुष्पा: द राइज – पार्ट 1 – 7.6
4. आर्य 2 – 7.4
5. अला वैकुंठप्रेमुलु – 7.3
6. जुलायी – 7.2
7. रेस गुर्रम – 7.1
8. परुगु – 7.1
9. हैप्पी – 7.1
10. S/O सत्यमूर्ति – 7
सध्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहे. मंगळवारी पुष्पा 2 चा क्रिप्टिक व्हिडिओ रिलीज करण्यात आला. यामध्ये पुष्पा तिरुपतीमध्ये तुरुंगातून पळून गेलेला असून बेपत्ता असल्याचं सूचित कऱण्यात आलं आहे. तेव्हा आता अल्लूचा पुष्पा 2 बॉक्सऑफिसवर आणि IMDB रेटिंगमध्ये काय जादू दाखवणार याचीच उत्सुकता आहे.