फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा अडचणीत सापडले आहेत. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील दातागंज पोलिसांनी त्यांच्याविरोधात आणि ट्रॅक्टर कंपनीच्या काही अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले असून न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतर खटला दाखल करण्यात आला. निखिल नंदा यांच्यासोबतच ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या प्रकरणामुळे बिग बी बच्चन यांचे जावई निखिल नंदा यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता नंदा ही बिझनेसमन निखिल नंदा यांची पत्नी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे सीएमडी निखिल नंदा, फर्मचे उत्तर प्रदेश प्रमुख, क्षेत्र व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, शाहजहांपूर डीलर आणि इतर तीन अधिकाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट आहेत. त्यांच्यावर ट्रॅक्टर एजन्सीचे मालक जितेंद्र सिंह यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, पापड हमजापूर गावातील रहिवासी ज्ञानेंद्र यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ज्ञानेंद्र यांचा भाऊ जितेंद्र सिंह दातागंजमध्ये ‘जय किसान ट्रेडर्स’ नावाची ट्रॅक्टर एजन्सी चालवत होता.
निखिल नंदा आणि इतरांविरुद्ध आरोप
सुरुवातीला जितेंद्र त्यांचा सहकारी लल्ला बाबू यांच्यासोबत व्यवसाय सांभाळायचा. परंतू, काही कौटुंबिक वादामुळे बाबू तुरुंगात गेल्यानंतर, जितेंद्र एकटाच एजन्सीचं काम सांभाळत होता. ज्ञानेंद्र यांनी आरोप केलेय की, निखिल नंदा यांनी कंपनीचे अधिकारी आशिष बालियान (एरिया मॅनेजर), सुमित राघव (सेल्स मॅनेजर), दिनेश पंत (यूपी हेड), पंकज भास्कर (फायनान्स कलेक्शन ऑफिसर), अमित पंत (सेल्स मॅनेजर), नीरज मेहरा (सेल्स हेड) आणि शिशांत गुप्ता (शाहजहांपूर डीलर) यांच्यासह जितेंद्रवर विक्री वाढवण्यासाठी वारंवार दबाव आणला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्या सर्वांनी विक्रीचं लक्ष्य पूर्ण न झाल्यास त्यांचा डीलरशिप परवाना रद्द करण्याची आणि त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची धमकी दिली होती. असं म्हटलं जातंय की, जितेंद्र खूप तणावाखाली होता आणि त्यानं त्याच्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्याच्या समस्या शेअर केल्या होत्या.
Chhaava Movie: ‘हमारी सबसे बडी कमाई…’, थिएटरमधील छोट्या मुलाने दिलेली गर्जना ऐकून विकी भावुक
निखिल नंदा आणि इतरांमुळे त्याने आत्महत्या केली का?
२१ नोव्हेंबर २०२४ रोजी, कंपनीचे काही अधिकारी त्याला पुन्हा भेटल्याचे वृत्त आहे, त्या भेटीमध्ये त्यांनी त्यावर (आत्महत्या केलेल्या व्यक्तीवर) कंपनीचा बिझनेस वाढवण्याचा दबाव टाकला. दुसऱ्या दिवशी, २२ नोव्हेंबर रोजी, जितेंद्रने आत्महत्या केली. जितेंद्रच्या कुटुंबाचा असा दावा आहे की, न्यायालयाने हस्तक्षेप करेपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. न्यायालयाच्या निर्देशानंतर, आता सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्रचे वडिल निखिल नंदा यांच्याबाबत काय म्हणाले?
जितेंद्रचे वडील शिव सिंह म्हणाले की, त्यांना निखिल नंदा यांच्या संबंधित कोणतीही माहिती नाही. परंतु त्यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूसाठी कंपनीला जबाबदार धरलं आहे. ते म्हणाले की, “मला माहीत नाही तो कोण आहे, पण आम्हाला न्याय हवा आहे.” दरम्यान, दातागंज पोलीस स्टेशनचे प्रभारी गौरव विष्णोई यांनी आत्महत्येचा तपास सुरू केल्याची माहिती दिली आहे. निखिल नंदा केवळ अभिषेक बच्चनचा मेहुणे असून ते राज कपूरची मुलगी रितू नंदा यांचे चिरंजीव आहेत. ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर हे त्यांचे मामा आहेत. तर करिश्मा कपूर, करीना कपूर खान आणि रणबीर कपूर ही मामे भाऊ- बहिण आहे.