मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कधी त्यांच्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत असतात तर कधी गाण्यामुळे. पण अमृता फडणवीस नेहमीच म्हणतात की, ‘कितीही टिका होऊ देत, मी माझ्या फॅन्ससाठी गाणी गातच राहणार आहे. त्याप्रमाणे आता ‘व्हॅलेंटाईन डे’ला त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे.
अमृता फडणवीस यांनी शंकराच्या अवतारातील स्वत:चा फोटो शेअर करत नव्या गाण्याची घोषणा केली आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे,”मी तुझी निवड आता कायमस्वरुपी केली आहे. तू माझ्या हृदयात, मनात आणि श्वासातही आहेस. ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine Day) हा आपल्या जवळच्या व्यक्तींच्या प्रेमासाठी ओळखला जातो. त्यादिवशी मी माझ्या रुद्राला एक संगीतमय प्रार्थना अर्पण करते.”
अमृता फडणवीसांचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणं भोलेनाथवर आधारित असू शकतं, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.