अभिनेता बॉबी देओल ( Bobby Deol ) त्याच्या शेवटच्या रिलीज झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटापासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटातील बॉबी या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या खूप टाळ्या मिळवल्या. रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ या चित्रपटापूर्वीच बॉबीने ‘आश्रम’ मधील भुमिकेमुळे पुन्हा प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. ‘आश्रम’मधील बॉबीच्या व्यक्तिरेखेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. प्रेक्षक आता या मालिकेच्या पुढच्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.
[read_also content=”‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, अक्षय-टायगरच्या ॲक्शनने उडवली खळबळ! https://www.navarashtra.com/movies/akshay-kumar-and-tiger-shroff-starrer-bade-miyan-chote-miyan-trailer-out-directed-by-ali-abbas-zafar-nrps-517902.html”]
या मालिकेच्या तीन सीझनने याआधीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. ‘आश्रम’मध्ये उत्कृष्ट अभिनयासह एक खोल आणि गुंतागुंतीची कथा होती. त्यामुळे आता प्रेक्षक त्याच्या चौथ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता रिपोर्टनुसार, ‘आश्रम’ सीझन 4 यावर्षी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहे. अभिनेता चंदन रॉय सन्याल याने चौथ्या सीझनचे संकेत दिले आहेत.
चंदन रॉयने अलीकडेच एका संवादादरम्यान खुलासा केला की, प्रत्येकजण त्याला ‘आश्रम’च्या चौथ्या सीझनबद्दल विचारत असतो. अभिनेत्याने सांगितले की त्याला वाटते की यावर्षी लोक हे विचारणे थांबवू शकतात कारण सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासोबतच त्याने काही स्क्रिप्टिंगबद्दलही सांगितले. सध्या शूटिंगचे काही भाग बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यंदा ही मालिका प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
बॉबी देओलशिवाय ईशा गुप्ता, त्रिधा चौधरी, आदिती पोहनकर आणि अनुरीता झा या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या वेब सीरिजचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. प्रेक्षक ‘आश्रम’ सीझन 4 ची आतुरतेने वाट पाहत आहेत.