फोटो सौजन्य - Instagram
Ashish Chanchlani Engaged : मागील दोन ते तीन वर्षांमध्ये अनेक YouTube चा स्टार कलाकारांनी लग्न केली आहेत. जादू आणि मैत्री सिमरन या दोघांनी देखील लग्न केले. काही दिवसांपूर्वीच यूट्यूबर ट्रिगड इन्सान आणि रुचिका राठोड या दोघांनी लग्न केले आणि सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यात आला होता. आता आशिष चंचलानी याचा पुढचा नंबर आहे असा अंदाज परतवला जात होता आणि ते खरे ठरले. असिस्टंटला आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सर्वांनाच आनंद दिला आहे आणि या पोस्टला काही वेळातच लाखो लाईक्स आले आहेत.
मल्टीस्टारर Housefull 5 ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट ?
यूट्यूबचा स्टार आशिषने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अभिनेत्री एली अव्राम हिच्यासोबत प्रेमाची कबुली दिली आहे. इंस्टाग्रामवर त्याचबरोबर मुलाखतींमध्ये आशिष चंचलानी याने त्याच्या झालेल्या ब्रेकअपबद्दल बऱ्याचदा सांगितले होते. इंस्टाग्रामवर त्याने अभिनेत्री एली अव्राम हिच्यासोबत फोटो शेअर केला आहे आणि या पोस्ट खाली त्याने लिहिले आहे की, “अखेर” आणि त्यानंतर हृदयाच्या इमोजी देखील लावला आहे.
आशिष चंचलानीच्या पोस्टवरून असे दिसते की दोघांनी अखेर सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे आणि त्यांचे नाते हृदयस्पर्शी पद्धतीने अधिकृत केले आहे. तथापि, आशिषने एलीसोबतच्या नात्याची पुष्टी करत असल्याचे सांगितलेले नाही. कदाचित ते एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. तथापि, वापरकर्त्यांनी त्यांच्या फोटोंवर त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.
आशिष चंचलानी हा आशियातील प्रसिद्ध आणि नामवंत यूट्यूबर पैकी एक आहे. त्याचे youtube ला ३०.७ मिलियन सबस्क्राईबस आहेत. त्याचबरोबर इंस्टाग्राम वर त्याला 17.2 लोकं फॉलो करतात. युट्युब वर तो त्याचा खास अभिनयासाठी ओळखला जातो.
आशिष चंचलानी याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर त्याची होणारी पार्टनर कोण आहे याबद्दल बरीच चर्चा सुरू झाली आहे. एली अव्राम ही एक स्वीडिश आणि ग्रीक अभिनेत्री आहे. सध्या ती मुंबईमध्ये राहते आणि तिने किस किस को प्यार करू, बिग बॉस त्याचबरोबर कोई जाने ना यांसारख्या प्रसिद्ध सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. तिचा जन्म हा स्वीडन येथे झाला आहे.