चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील गायब! एक चमचा तुपाचा 'या' पद्धतीने करा वापर
भारतीय स्वयंपाक घरात आवर्जून दिसून येणारा पदार्थ म्हणजे तूप. आयुर्वेदामध्ये तुपाला खूप जास्त महत्व आहे. तुपाचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. नियमित एक चमचा तुपाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीर आतून हायड्रेट ठेवतात. हल्ली बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारातील महागड्या केमिकल ट्रीटमेंट तर कधी महागडे स्किन प्रॉडक्ट वापरतात. पण सतत केमिकल युक्त स्किन प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर कायमच स्किन प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी तुपाचा वापर करावा. तुपामध्ये असलेले घटक त्वचा आतून हायड्रेट ठेवतात. याशिवाय त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य कायम टिकवून ठेवतात. तुपाचे सेवन केल्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासोबतच पचनक्रिया सुद्धा मजबूत राहते आणि शरीर कायमच निरोगी राहत. थंडीच्या दिवसांमध्ये कोरड्या पडलेल्या त्वचेला पोषण देण्यासाठी तुपाचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा अतिशय सुंदर दिसते. तूप अन्नपदार्थांची चव वाढवण्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा शक्तिशाली मानले जाते. चला तर जाणून घेऊया चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी तुपाचा वापर कसा करावा.
तूप वापरताना योग्य ती काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. तुपाचे सेवन योग्य प्रमाणात करावेत. जास्त तेलकट त्वचा किंवा वारंवार पिंपल्स येत असतील तर तुपाचा वापर अजिबात करू नये. यामुळे आणखीन जास्त पिंपल्स येतात आणि त्वचा खराब होते. दिवसभरात सतत तुपाचे सेवन केल्यास शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, ज्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. अंघोळीला जाण्याआधी चमचाभर तूप हातांवर घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावे. यामुळे त्वचा मुलायम होते. याशिवाय तुपाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा कायमच हायड्रेट आणि तेजस्वी राहील.
सकाळी उठल्यानंतर नियमित एक चमचा तूप खाल्ल्यास किंवा कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. यामुळे आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. आयुर्वेदानुसार तूप, थंड, स्निग्ध आणि रसायन मानले जाते. यामध्ये असलेले घटक वात आणि कफ संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि डेड स्किन नष्ट करण्यासाठी तुपाचा वापर करावा. चेहऱ्यावरील मृत पेशी कमी करून त्वचा उजळदार करण्यासाठी तुपाचा वापर करावा. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा मऊ ठेवण्यासाठी तूप वापरावे.






