Akshay Kumar Housefull 5 To Be Released On OTT
अक्षय कुमारचा मल्टीस्टारर ‘हाऊसफुल ५’ चित्रपट ६ जून २०२५ रोजी झाला होता. बॉलिवूड इंडस्ट्रीतील तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले. हटके क्लायमेक्स असलेल्या चित्रपटातील विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकले आहेत. चित्रपटाने जगभरात २८८ कोटींची कमाई केलेली आहे, तर १६० कोटींची कमाई चित्रपटाने देशभरामध्ये केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर ‘हाऊसफुल ५’ चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित, ‘हाऊसफुल ५’ चित्रपट कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार आहे ? कधी प्रदर्शित होणार आहे ? हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत.
Metro In Dino चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद, चित्रपटाची ८ व्या दिवसाची कमाई किती ?
कलाकारांमुळे चर्चेत राहिलेला हा चित्रपट आणखी एका कारणामुळे चर्चेत होता. खरंतर, ‘हाऊसफुल ५’ चित्रपट ‘हाऊसफुल ५ए’ आणि ‘हाऊसफुल ५बी’ अशा दोन क्लायमेक्स आवृत्त्यांसोबत बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. दोन्हीही चित्रपटांतील एक मनोरंजक गोष्ट अशी होती की, दोघांचाही क्लायमॅक्स वेगवेगळा होता. प्रेक्षकांना निर्मात्यांचा हा प्रयोग आवडला आणि त्याबरोबरच ‘हाऊसफुल ५’ने बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली. आता ओटीटीवरही प्रेक्षकांना दोन क्लायमेक्समध्येच चित्रपट पाहायला मिळणार का ? हे तरी अद्याप गुलदस्त्यातच आहे. ज्यांना मल्टीस्टारर ‘हाऊसफुल ५’ चित्रपट थिएटरमध्ये पाहायला नाही मिळाला, त्यांच्यासाठी एक ‘गुड न्यूज’ आहे.
प्रेक्षकांना आता घरबसल्या ओटीटीवर क्राईम आणि थ्रिलर असलेला ‘हाऊसफुल ५’चित्रपट पाहायला मिळणार आहे. न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘हाऊसफुल ५’चित्रपट लवकरच ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’या ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होण्याची शक्यता आहे. तर काही मीडिया रिपोर्टनुसार, ‘हाऊसफुल ५’चित्रपट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. याबद्दलची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच, निर्मात्यांकडून आणि दिग्दर्शकांकडून चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा करण्याची शक्यता आहे.
“अखेर आज आमची इच्छा पूर्ण….”, संकर्षणने शेअर केला ‘त्या’ आजींसोबतचा भावूक व्हिडिओ…
तरुण मनसुखानी दिग्दर्शित आणि फरहाद सामजी लिखित, ‘हाऊसफुल ५’चित्रपटामध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंग, डिनो मोरिया, नर्गिस फाखरी, फरदीन खान, जॉनी लीव्हर, चंकी पांडे, रणजित, श्रेयस तळपदे, ध्वनि शर्मा, अर्चना ढेरिन, निकीतीन ढेर, अर्चना पूरन सिंह, बॉबी देओल आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक फ्रँचायझी असलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये आहे. हा पहिला चित्रपट असून ज्याचे पाच सिक्वेल रिलीज झाले. यापूर्वी रिलीज झालेल्या चार चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती.