भैरवी आणि अनिश वटपौर्णिमेच्या दिवशी घेणार सप्तपदी, होणार एकमेकांचे जीवनसाथी...
कलर्स मराठीवरील ‘अशोक मा. मा.’ मालिकेत भैरवीसाठी यंदाची वटपौर्णिमा ठरणार आहे, खास कारण याचदिवशी भैरवी सप्तपदी घेणार आहे. अशोक मामांच्या आशीर्वादाने अनिश – भैरवी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार आहेत. माजगावकरांकडे आता आनंदाचे वातावरण आहे. भैरवी आणि अनिशचे लग्न होणार आहे. आणि याचसाठी विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, एक व्यक्ति सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे आणि ती म्हणजे भैरवीचे अशोक मामा! पारंपरिक पोशाख, डोळ्यांत आठवणींचं ओझं आणि चेहऱ्यावर आनंद अशोक मामा फक्त मामा नाहीत, तर भैरवीसाठी आई-वडिलांची जागा घेणारे आधार आहेत.
वट पौर्णिमेच्या शुभ दिवशी भैरवीने सप्तपदी घेणं हा एक योगायोग! मामीच्या आठवणींनी भारावलेले मामा, भैरवीला मामीच्या हातातल्या बांगड्या देतात आणि सांगतात “हे तुझ्या संसारासाठी शुभचिन्ह आहे. तूही वेणू प्रमाणे संसार निभाव.” याचवेळी ते भैरवीकडून एक वचन घेताना दिसणार आहेत “साता जन्मांची ही गाठ फक्त सप्तपदीतच नाही, तर मामीच्या आठवणींतूनही घट्ट राहिली पाहिजे.” अशोक मामांचा हा क्षण, रसिक प्रेक्षकांना डोळ्यांत अश्रू आणणारा ठरणार हे नक्की. या लग्नात केवळ विधी नाही, तर प्रेम, विश्वास आणि कुटुंबाचा उबदार श्वास आहे. तेव्हा भैरवी – अनिशच्या लग्नाला यायचं हा ! पहा, Blockbuster रविवार, 15 जून रोजी, ‘अशोक मा. मा.’ दु. 2 वा. आणि रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर.
‘दोन पेग घेण्यात काहीच गैर नाही…’, जावेद अख्तर यांनी दारूशी केली धर्माची तुलना; असं का म्हणाले ?
भैरवी म्हणजेच रसिक वाखारकर म्हणाली, ” अशोक मा.मा. मालिकेत भैरवी आणि अनिश यांचे अखेर लग्न होणार आहे. विधीवत लग्नसोहळा पार पडणार आहे. आणि विशेष म्हणजे हि वटपौर्णिमा भैरवीसाठी खास ठरणार आहे. मामा मालिकेत भैरवी आणि अनिशला सांगताना दिसणार आहेत सात जन्माचे वचन हे फक्त मुलीनेच मुलाला द्यायचे नसतं नवरा देखील बायकोला देऊच शकतो. आणि म्हणूनच लग्नाच्या दिवशीच वटपौर्णिमा असल्याने भैरवी आणि अनिश वडाच्या झाडाची पूजा करताना तर दिसणार आहेतच पण झाडाला फेरे मारताना दिसणार आहेत. आम्हांला लग्न शूट करताना खुपचं मज्जा आली. सगळे छान नटले होते. अशोक मामांचा लूक आम्हाला सगळ्यांनाच भारी वाटलं. यानिमित्ताने मामांनी त्यांच्या लग्नाचे किस्से देखील आम्हांला सांगितले. हे किस्से ऐकण्याची सुवर्णसंधी आम्हांला मिळाली.”
संजय कपूर यांची पहिली पत्नी Nandita Mahtani आहे तरी कोण? जिने रणबीर कपूरलाही केले डेट
लग्न मंडपात भैरवी – अनिशची धडाकेबाज एन्ट्री होणार आहे. लग्नाच्या लूकमध्ये भैरवी खूपच सुंदर दिसत आहे. लाल रंगाची सुंदर साडी, शेला, नथ तिच्यावर खुलून दिसतं आहे. विवाह विधी पारंपरिक पध्द्तीने पार पाडल्या जाणार आहेत. सप्तपदी, होम… लग्न सोहळा आनंदात पार पडणार हे नक्की. पण, दुसऱ्या बाजूला राधा स्वतःशीच मनात पुन्हा शपथ घेते “सौभाग्यवती हो… पण सुखाचा संसार? तो काही मी तुला करू देणार नाही!” भविष्यात राधा काय नवीन डाव खेळणार हे अजून स्पष्ट नाही, पण अशोक मामांची सावली भैरवीवर असेपर्यंत ती प्रत्येक संघर्षाला सामोरी जाणार हे निश्चित!
पुढे मालिकेत काय होणार हे जाणून घेण्यासाठी बघा अशोक मा.मा. कलर्स मराठीवर.