(फोटो सौजन्य - x अकाउंट)
लेखक-गीतकार जावेद अख्तर हे त्यांच्या स्पष्टवक्त्यासाठी ओळखले जातात. ते कोणत्याही मुद्द्यावर संकोच किंवा भीती न बाळगता आपले मत व्यक्त करतात आणि त्यासाठी अनेकदा ते ट्रोलर्सचे लक्ष्य देखील बनले आहे. जावेद अख्तर स्वतः नास्तिक आहेत आणि अनेकदा संघटित धर्माविरुद्ध बोलताना ते दिसले आहेत. अलीकडेच त्यांनी धर्माच्या विषयावर चर्चा केली आणि त्याची तुलना दारूशी केली आहे. ते नक्की काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.
जावेद अख्तर यांनी अलीकडेच आज तक रेडिओला दिलेल्या मुलाखतीत धर्मावर चर्चा केली. धर्माची दारूशी तुलना करताना ते म्हणाले की, ‘धर्म आणि दारू दोन्हीही ठीक आहेत जोपर्यंत ते मर्यादित प्रमाणात सेवन केले जातात, परंतु क्वचितच जबाबदारीने त्याचे सेवन केले पाहिजे.’ असे त्यांनी म्हटले आहे.
संजय कपूर यांची पहिली पत्नी Nandita Mahtani आहे तरी कोण? जिने रणबीर कपूरलाही केले डेट
दोन पेग व्हिस्की खरोखर फायदेशीर आहेत
ते पुढे म्हणाले की, दिवसाला दोन पेग व्हिस्की खरोखर फायदेशीर आहेत. समस्या तेव्हा येते जेव्हा लोक फक्त दोन पेगवर थांबू शकत नाहीत. जावेद अनेक दशकांपासून दारूपासून दूर आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे दारूमध्ये वाया घालवल्याबद्दल त्यांना अनेकदा पश्चात्ताप होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दारू आणि धर्मात खूप साम्य आहे
तसेच ते पुढे म्हणाले, ‘दारू आणि धर्मात खूप साम्य आहे. कोण जास्त काळ जगतो हे पाहण्यासाठी अमेरिकन लोकांनी एक सर्वेक्षण केले. जो व्यक्ती दारू पीत नाही किंवा जो व्यक्ती दररोज एक संपूर्ण बाटली पितो. या दोघांचा तपस केला. ज्यामध्ये असे आढळून आले की दोन्हीही योग्य नाहीत. जे लोक सर्वात जास्त काळ जगतात ते आहेत जे रात्रीच्या जेवणापूर्वी नियमितपणे दोन पेये घेतात. औषधांमध्ये अल्कोहोल असते, ते इतके वाईट कसे असू शकते? जास्त सेवन वाईट आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे.
छोट्या मधमाशीमुळे संजय कपूर यांना आला हृदयविकाराचा झटका? पोलो खेळताना खेळताना नक्की काय घडलं?
श्रद्धा आणि मूर्खपणा यात काय फरक आहे
त्यांनी सर्व प्रकारच्या धर्मांबद्दलच्या त्यांच्या नापसंतीबद्दलही उघडपणे सांगितले. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी त्यांचा आध्यात्मिक गुरू सद्गुरुंशी वाद झाला होता. तर्क, कारण, पुरावे, साक्षी नसलेली कोणतीही गोष्ट म्हणजे श्रद्धा. मला खरोखरच आश्चर्य वाटते की श्रद्धा आणि मूर्खपणामध्ये काय फरक आहे, कारण ही मूर्खपणाची व्याख्या देखील स्पष्ट आहे. मी ‘श्रद्धा’ स्वीकारण्यास तयार आहे, पण त्यात तर्क असला पाहिजे.’ असे ते म्हणाले.