Chandan Arora Exclusive Interview On Kan Khajura Web Series
सोनी लिव्हवरील ‘कनखजुरा’ (Kan Khajura) वेबसीरीजची अजूनही प्रेक्षकांमध्ये जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. ही वेबसीरीज ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० मे रोजी रिलीज झाली आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन दिग्दर्शक चंदन अरोरा यांनी केले आहे. वेबसीरीजच्या प्रमोशन दरम्यान दिग्दर्शक चंदन अरोरा यांनी ‘नवराष्ट्र डिजीटल’सोबत वेबसीरीजच्या कथानकावर आणि एकूण वेबसीरीजच्या अनुभवावर भाष्य केलं आहे.
संजय कपूर यांची पहिली पत्नी Nandita Mahtani आहे तरी कोण? जिने रणबीर कपूरलाही केले डेट
‘नवराष्ट्र डिजीटल’सोबत बोलताना दिग्दर्शक चंदन अरोरा यांनी वेबसीरीजच्या कथानकाबद्दल सांगितले की, “दोन भावांवर आधारित या वेबसीरीजचं कथानक आहे. क्राईम आणि थ्रिलर धाटणीवर बनलेली ही वेबसीरीज प्रेक्षकांना खूपच भावताना दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षक या वेबसीरीजचा दमदार प्रतिसाद देताना दिसत आहे. प्रेक्षकांप्रमाणे आम्हाला देखील वेबसीरीजचं कथानकही आम्हाला भावलं आहे. क्राईमच्या स्टोरीमध्ये आपल्याला सहसा फॅमिली पाहायला मिळते किंवा कोणकोणत्या केसेस असतात. पण आमच्या कथानकात आपल्याला दोन भावांची इमोशनल कहाणी पाहायला मिळेल. परंतु प्रेक्षकांना ही वेबसीरीज पुर्णपणे क्राईम- थ्रिलरसारखीच पाहायला मिळेल.”
छोट्या मधमाशीमुळे संजय कपूर यांना आला हृदयविकाराचा झटका? पोलो खेळताना खेळताना नक्की काय घडलं?
कनखजुरा (गोम)चा वेबसीरीजमध्ये का वापर करण्यात आला आहे ? या प्रश्नाबद्दल बोलताना चंदन अरोरा यांनी सांगितले की, प्रेक्षकांना ही वेबसीरीजच पाहायला लागेल. जो पर्यंत ते वेबसीरीज पाहत नाहीत. तो पर्यंत त्यांना त्या गोष्टीचा उलगडा होणार नाही. मोहित रैना आणि रोशन मॅथ्यू हे दोघंही या वेबसीरीजमध्ये एका गुपितेचा उलगडा करणार आहे. प्रेक्षकांना नेमकं ते काय आहे. या प्रश्नाचं उत्तरही वेबसीरीज पाहिल्यावरच कळेल. या वेबसीरीजचं कथानक प्रेक्षकांना भुतकाळ आणि वर्तमानकाळाच्या आधारितच आहे. त्या प्रमाणेच आम्ही स्टोरीटेलिंग केली आहे. ही वेबसीरीज प्रेक्षकांना आणखीन आवडेल, अशी आम्हाला आशा आहे, असं देखील दिग्दर्शक चंदन अरोरा यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.






