इंडियाज बेस्ट डान्सर 4 : टेलिव्हिजनवर अनेक डान्स रिअॅलिटी शो सुरु आहेत. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरचा इंडियाज बेस्ट डान्सरचे ३ सिझन यशस्वीरित्या पार पडले. आता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन घेऊन येत आहे इंडियाज बेस्ट डान्सरची चौथी आवृत्ती.इंडियाज बेस्ट डान्सर हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनेने स्वतः विकसित केलेला डान्स रियालिटी शोचा फॉरमॅट आहे. असामान्य प्रतिभेला त्यांचे डान्सचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक योग्य मंच प्रदान करून त्यांच्यातून ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ चा शोध घेण्याचा प्रवास निर्मात्यांनी 1 जून 2024 रोजी स्वप्ननगरी मुंबईत करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – पुनीत पाठक इंस्टाग्राम अकाउंट)
[read_also content=”आर माधवनचे मल्टी-हायफेनेट बेस्ट 8 चित्रपट! पाहायलाच हवेत https://www.navarashtra.com/movies/r-madhavan-best-8-movies-do-not-miss-on-occasion-of-his-birthday-list-for-fans-541031.html”]
या मंचावर तुम्ही तुमचे डान्सचे कौशल्य दाखवू शकतात. त्याचबरोबर या प्रतिष्ठित मंचावर थिरकण्यासाठी तुम्ही सज्ज असलात, तर 1 जून 2024 रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर अमृत शक्ती, चांदिवली फार्म रोड, ऑफ साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400072 येथे ऑडिशनची सुरुवात झाली आहे. या नव्या सीझनमध्ये नव्या कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत जे. पाठक, सीझन 2 ची विजेता सौम्या कांबळे आणि सीझन 3 मधले स्पर्धक बूगी एलएलबी, शिवांशु सोनी, आणि विपुल कांडपाल हे उपस्थित असणार आहेत.
मुंबईतील ऑडिशनविषयी पुनीत जे. पाठक म्हणाला की, “मुंबई म्हणजे भारतीय मनोरंजनाचे स्पंदन पावणारे हृदय आहे, जेथे स्वप्नांना पंख फुटतात आणि तारे जन्माला येतात. आम्ही या शहरातील नवीन डान्स सेंसेशन शोधत आहोत, एक असे रत्न, जे मंचावर येऊन चमकण्यास सज्ज असेल. इंडियाज बेस्ट डान्सर हा तुमचा ध्यास सत्यात उतरविण्याची एक संधी आहे. ही संधी गमावू नका – 1 जून 2024 रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूल, अंधेरी येथे या तुमचे कौशल्य आम्हाला दाखवा!”
एक माजी स्पर्धक आणि दुसऱ्या सीझनची विजेती सौम्या कांबळेने सांगितले की, या मंचाने तिचे आयुष्य कसे पालटून टाकले. ती म्हणाली, “इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनच्या मुंबई ऑडिशनमध्ये सहभागी होणे स्वप्नवत वाटत आहे. 2021 मध्ये मी ऑडिशन दिले, तेव्हा मला कल्पनाच नव्हती की ही ऑडिशन म्हणजे माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असेल! ही एक संधी होती, जी मी हस्तगत केली आणि त्यातून अमर्याद शक्यतांचे दरवाजे माझ्यासाठी खुले झाले. या शो ने मला माझी कला घासून-पुसून चमकवण्यात मला मदत केली, मला नवीन डान्स स्टाइल्स बारकाईने शिकवल्या आणि त्यातूनच मी आज जी आहे ती डान्सर घडले. मुंबई ऑडिशनमध्ये नवीन उत्साही आणि होतकरू डान्स-वेड्यांना भेटण्यास मी उत्सुक आहे, ज्यांची स्वप्ने मोठी आहेत आणि डान्सच्या जगात ज्यांना मोठे नाव कमवायचे आहे त्यांना माझ्यातर्फे सर्वांना शुभेच्छा!”