कॉमेडी स्टार भाऊ कदम (Bhau Kadam) हा अनेकांचा आवडता कलाकार आहे. भाऊ कदम आता एका चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये दिसणार आहे. जिओ स्टुडिओज (Jio Studios) व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ (Ghe Double) या चित्रपटाचे भन्नाट टीझर (Ghe Double Teaser Poster) पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी ‘घे डबल’ हा चित्रपट चित्रपटगृहात झळकणार आहे.
धम्माल एंटरटेनमेंटचा डब्बल बार,
सर्व टेंशन्सवर करणार डब्बल वार !
तुम्हाला खळखळून हसवायला घेऊन येत आहोत भाऊ कदमच्या कॉमेडीचा डब्बल धमाका,
‘घे डब्बल’ ३० सप्टेंबर पासून सर्व चित्रपटगृहांत. #घेडब्बल #GheDouble #InCinemas30Sep
@vishwasjoshi999
#NikhilSane pic.twitter.com/1nrVJyjZuY — Jio Studios (@jiostudios) August 16, 2022
या चित्रपटात भाऊ कदम आणि भूषण पाटील यांची जबरदस्त जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज चित्रपटाचे निर्माते आहेत.
[read_also content=”मुकेश अंबानींना धमकावणारा गजाआड; अफजल गुरू घेतले नाव https://www.navarashtra.com/crime/arrest-threatening-mukesh-ambani-who-took-the-name-afzal-guru-nrgm-316628/”]
चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणतात, “जिओ स्टुडिओज वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यातच ‘घे डबल’ हा विनोदी चित्रपट ते सादर करत आहेत. हा एक निखळ मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट असून यात भाऊ कदम आणि भूषण पाटील हे दोघं विनोदवीर धुमाकूळ घालणार आहेत. मला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांचे डबल मनोरंजन नक्की करणार !”