‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहतायेत. या चित्रपटाचा पहिला भाग ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे. यापूर्वी, निर्मात्यांनी या चित्रपटाचा एक नवीन व्हिडिओ रिलीज केलायं. ज्यामध्ये अमिताभ बच्चन तलवारबाजी करताना दिसतायेत. हा व्हिडिओ चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलायं. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘फक्त ९ दिवसात भेटा गुरू आणि त्यांचे प्रभास्त्र यांना ९ सप्टेंबरला सिनेमागृहात’
चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन व्यतिरिक्त रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन देखील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणारेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणारे.