हिना खानची महिमा चौधरीसाठी खास पोस्ट, 'देवदूत' म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Hina Khan Shared Special Post For Mahima Chaudhary : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून घराघरांत प्रसिद्धीझोतात आलेली अक्षरा अर्थात हिना खान…. या मालिकेनेच हिनाला भारतात विशेष प्रसिद्धी मिळाली. गेल्या काही दिवसांपूर्वीच हिनाने सोशल मीडियावरून ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. अभिनेत्रीला तिसऱ्या स्टेजचा हा आजार झाला आहे. दरम्यान, हिना ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत असून आजाराबद्दल ती वेळोवेळी सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असते.
हे देखील वाचा – ‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘तो’ दमदार आवाज नेमका कोणाचा ? वेधलं लक्ष
काही तासांपूर्वीच हिनाने इन्स्टाग्रामवर महिमा चौधरीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे. हिनाला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिला धीर देण्यासाठी इन्स्टा पोस्ट शेअर केलेली होती. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे, महिमा चौधरी. हिनाची पहिली केमोथेरेपी होती त्यावेळी महिमा स्वत: तिच्यासाठी रुग्णालयात पोहोचली होती. शेअर केलेल्या पोस्टमध्ये हिना म्हणते, “हा फोटो माझ्या पहिल्या केमोथेरेपीच्या वेळेचा आहे. या देवदूत महिलेने मला हॉस्पिटलमध्ये भेटायला येऊन खूप मोठं सरप्राईज दिलं. माझ्या आयुष्यातील या कठीण टप्प्यात ती माझ्यासोबत राहिली, तिने मला त्या काळात मार्गदर्शन करत केलं, मला प्रेरित करण्यासोबतच तिने माझा मार्ग प्रकाशमान केला. ती माझ्यासाठी एक हिरो आहे शिवाय ती एक उत्तम व्यक्ती देखील आहे.”
“माझा प्रवास तिच्यापेक्षा सोपा व्हावा यासाठी तिने अनेक मार्ग शोधले. या कठीण आजारातही तिने माझा आत्मविश्वास वाढवला आणि प्रत्येक मार्गावर, प्रत्येक टप्प्यावर तिने मला कम्फर्टेबल ठेवण्याचा विचार केला. तिला झालेल्या त्रास माझ्यासाठी मोठी शिकवण होती, विशेष म्हणजे मी त्यातूनच फार काही शिकली. तिचं प्रेम आणि दयाळूपणा माझ्यासाठी बेंचमार्क बनले आणि तिचे धैर्य हे माझे सर्वात मोठे ध्येय बनले. आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी झालो आहोत. आम्ही दोघींनीही एकमेकींसोबत वैयक्तिक अनुभव शेअर केलेले आहेत. पण तिने मला आजपर्यंत एकदाही असे वाटून दिले नाही की, मी एकटी आहे. तिने त्या सर्व गोष्टींचा सामना केला आहे आणि मी सुद्धा त्याचा सामना करु शकते याची तिने मला जाणीव करुन दिली. महिमा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… आणि माझ्याकडून खूप खूप सारं प्रेम”
२०२२ मध्ये महिमा चौधरी हिला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. दरम्यान, अभिनेत्रीने त्यावर उपचार घेतले असून ती सध्या हिनाला ब्रेस्ट कॅन्सरमधून बरं होण्यासाठी मदत करते.