बिग बॉस मराठीचा चौथा (Bigg Boss Marathi 4) सीझन सुरु होऊन १२ दिवस झाले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात आज महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)सदस्यांची शाळा घेणार आहेत. गेल्या आठवड्यातील चावडीमध्ये महेश सरांनी सदस्यांची शाळा घेतली. सदस्यांची कानउघाडणी केली तर सदस्यांना कुठे ते चुकतं आहे सांगितले.
आता आज पुन्हा एकदा चावडी भरणार आहे. आजच्या चावडीवर महेश मांजरेकर कुणाला वठणीवर आणणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. बिग बॉस मराठीच्या घरात काही सदस्यांमध्ये मैत्रीचं छान नातं निर्माण झालं आहे. तर काही सदस्यांमध्ये शत्रूत्व आहे. काही सदस्यांमध्ये टोकाचे वाद झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महेश मांजरेकरांच्या चावडीवर काय होणार ? हे पाहावे लागेल. आज रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.