फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
बिग बॉस ओटीटी ३ चे टॉप स्पर्धक : ओटीटीवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस ओटीटी सिझन ३ सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धेक त्यांच्या भांडणाने रोजच चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. त्याचबरोबर घरातला मुख्य बिग बॉस त्यांना नवनवे चॅलेंजेस देत आहेत. आता बिग बॉसचा फिनाले लवकरच येणार आहे त्यामुळे स्पर्धेकांमध्ये जिंकण्याची उत्कंठा पाहायला मिळत आहे. फिनालेची तारीख सुद्धा समोर आली आहे. बिग बॉसचा हा खेळ आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचला आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. याचदरम्यान आता शो संदर्भात धमाकेदार बातमी समोर आली आहे. आता शोबद्दल सतत अपडेट देणाऱ्या द खबरीने शोच्या टॉप ३ स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत.
बिग बॉस ओटीटीच्या टॉप ३ स्पर्धकांची नावे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. सोशल मीडियावर द खबरीच्या एक्स अकाउंटनुसार टॉप ३ स्पर्धक कोण आहेत? हे तिघे रणनीती बनवून घरातच आपला खेळ खेळत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये अरमान मलिक, सना मकबूल आणि रणवीर शोरे अशी टॉप ३ स्पर्धकांची नावे आहेत. ही तिन्ही नावे अद्याप निश्चित झाली नसली तरी खेळाच्या आधारेच त्यांची नावे समोर आली आहेत. अंतिम फेरी होणे बाकी आहे, त्यानंतरच अंतिम स्पर्धकाचे नाव समोर येणार आहेत. टॉप ३ मध्ये अरमान मलिकचे नाव पाहून बऱ्याच जणांना धक्का बसला आहे.
Top 3 contestants who are actually perforimg in the show and playing it like a game#SanaMakbul#RanvirShorey and #ArmaanMalik
The least we can expect is winner among these 3 contestants
Bhaade ke fans leke aane walu ko bahar karo, they are giving nothing to this show
— The Khabri (@TheKhabriTweets) July 17, 2024
बिग बॉसच्या घरात दोन दिवसांपूर्वी नव्या वाईल्डकार्डची एंट्री झाली आहे. त्यामुळे घरामधील अनेक नवी समीकरणे बदलली आहेत. अदनान शेखच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर हा खेळ मजेशीर झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील महिन्याच्या ४ तारखेला फिनाले होऊ शकते. खेळाच्या अंतिम तारखेच्या चर्चेसोबतच विजेत्याच्या बक्षीस रकमेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
४ ऑगस्ट रोजी फिनाले आयोजित केला जाणार आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. शोच्या विजेत्याला २५ लाख रुपयांची मोठी रक्कम मिळणार आहे. रोख बक्षीस व्यतिरिक्त, ट्रॉफी तसेच कार आणि वॉकी-टॉकी गिफ्ट हॅम्पर सुद्धा असणार आहे.