विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आणि वादाच्या भोवऱ्यात सापडला. पण जरीही चित्रपटाचा ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात सापडला असला तरीही तो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटातले अनेक सीन्स इतिहास तज्ज्ञांना दाखवून त्यातील चुका दुरुस्त करूनच रिलीज केला जावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ह्या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलंय जाणून घेऊया...
Chhava Star Cast Fees
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. ट्रेलर जरीही वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरीही तो अनेक प्रेक्षकांना आवडला आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, त्यातील काही दृश्यांमुळे वाद निर्माण झाला आहे.
चित्रपटात एका गाण्यातील दृश्यात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई नृत्य करताना दिसत आहेत. हे दृश्य त्वरित काढण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. इतकंच नाही, तर या प्रकरणी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपट आधी इतिहास तज्ज्ञांना दाखवून, त्यातील चुका दुरुस्त करूनच रिलीज केला जावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
'छावा'चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने महाराणी येसूबाईंच्या भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाच्याही भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. त्याने मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.
‘आमच्यासाठी पण शिवाजी महाराज दैवतच... जो महाराष्ट्रात’, विकी कौशलचं प्रांजळ मत, मराठीतील साधेपणा होतोय व्हायरल
Rashmika Mandanna vs Congress MLA Ravi Ganiga: trouble for giving controversial statement
'दृश्यम २' नंतर अक्षय खन्ना 'छावा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी त्याला २ कोटी रुपये फी देण्यात आली आहे.
चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता आशुतोष राणा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारत आहे. यासाठी त्याला ८० लाख रुपये मानधन मिळालेय.
विकी कौशलच्या या चित्रपटात दिव्या दत्ताचीही महत्त्वाची भूमिका आहे. ती राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला ४५ लाख रुपये मिळाले आहेत.