"मी जिथे शिकायला गेलो तिथून हाकललं, कारण…", प्रतीक पाटीलने सांगितली आपबिती; कारण सांगत केला खुलासा
अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांचे मुलं स्टार किड्स म्हणून जन्मताच चर्चेमध्ये असतात. परंतु एक स्टार किड (Star Kid) असा आहे, ज्याने आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केलाय. त्या अभिनेत्याचं आपल्या परखड आयुष्यात बॉलिवूड सितारा पर्यंतचा प्रवास करणाऱ्या मुलाचं नाव आहे, प्रतिक बब्बर (Prateik Babbar). प्रतिक बब्बर हा सुपरस्टार राज बब्बर (Raj Babbar) आणि स्मिता पाटील (Smita Patil) यांचा मुलगा आहे. प्रतिकचे आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले राहिले. प्रतिकचा आज वाढदिवस असून त्याच्या संघर्षमय जीवनाबाबत काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत.
बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरचा जन्म २८ नोव्हेंबर १९८६ रोजी झाला आहे. स्मिता पाटील यांनी त्याला जन्म दिला पण मातृत्वाचे सुख त्यांच्या नशीबी नव्हते. मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच स्मिता पाचील यांचे निधन झाले. स्मिता यांना ब्रेन इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या शरीराच्या अवयवांनी काम करणं बंद केले होतं. आईच्या निधनानंतर, प्रतीक बब्बरचे संगोपन स्मिता यांच्या आई-वडिलांनी केले होते. प्रतीक बब्बरने अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या आयुष्यातील सर्वच चढ-उतारांबद्दल भाष्य केले आहे.
आईच्या निधनानंतर प्रतीकचे संगोपन त्याच्या आजीने केले होते. परंतु एकेकाळी तो आपल्या वडिलांचा द्वेष करायचा. १२ वर्षांचा असतानाच प्रतिकला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. तो पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेला होता. मात्र, आज प्रतिक त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडला आहे. प्रतीक एका मुलाखतीत म्हणाला होता की, “माझ्या वडिलांकडे माझं म्हणणं ऐकायला वेळ नव्हता. प्रत्येकजण मला माझ्या आईबद्दलट सांगायचे. पण, मला त्याचा काही फरक पडला नाही. मला नेहमी प्रश्न पडायचा की, माझी आई माझ्यासोबत का नाही?”
प्रतीकला वयाच्या १२ व्या वर्षी ड्रग्जचे मोठ्या प्रमाणावर व्यसन होते. ड्रग्जच्या व्यसनाबद्दल बोलताना प्रतीक बब्बरने एका मुलाखतीत सांगितले होते की, ” १२ वर्षांचा असतानाच मला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. त्यामुळे एकदा नाही तर दोनदा मला रिहॅब सेंटरमध्ये भरती करण्यात आलं होतं. ड्रग्जच्या व्यसनानेच माझा मृत्यू जवळजवळ झालाच होता. माझ्या आईसारखी असलेली माझी आजी मला ड्रग्जच्या आहारी गेल्याच्या काळजीनेच हे जग सोडून गेली. मात्र, हळूहळू मी ड्रग्जचे जग सोडून सामान्य जीवनात परतलो आणि अनेक बड्या कलाकारांसोबत काम करु लागलो.”
प्रतिकने आपल्या फिल्मी करियरची सुरूवात २००८ मध्ये एका चित्रपटाच्या माध्यमातून केली. या चित्रपटाचे नाव जाने ‘तू या जाने ना’ असं होतं. या चित्रपटात प्रतिकने जेनेलिया डिसोझाच्या भावाची भूमिका साकारली होती. परंतु या चित्रपटातून प्रतिकची फारशी ओळख निर्माण झाली नाही. या चित्रपटानंतर त्याने ‘एक दीवाना था’, ‘धोबी घाट ‘ अशा हीट चित्रपटांमध्ये काम केली. त्याचप्रकारे मुल्क, बागी २ , छिछोरे आणि दरबार अशा चित्रपटांतून प्रतिकने आपल्या स्वत:ची ओळख निर्माण केली.
“प्रसिद्धीसाठी मला कपडे काढण्याची…”, MMS लीक झाल्यानंतर प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीने सोडलं मौनजानेवारी २०१८ मध्ये प्रतिकने त्याची गर्लफ्रेंड सान्या सागरशी साखरपुडा केला होता. त्यानंतर या दोघांचे २०१९ मध्ये लग्न झाले. आता प्रतिक आणि सान्या आनंदाने आपले विवाहित जीवन व्यतीत करित आहेत. त्याचसोबतच प्रतिकने आपल्या वैयक्तिक जीवनात प्रसिद्धीपासून दूर राहणेच पसंत केले आहे.