Bollywood stars in South : गेल्या काही काळापासून दक्षिणेपासून ते ईशान्येपर्यंत साऊथच्या चित्रपटांची (South cinema) जादू पाहायला मिळत आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांच्या कमाईवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळेच आता बॉलीवूड स्टार्सही साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे वळू लागले आहेत. साऊथच्या काही आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ते दीपिका पदुकोण (Deepika Padukone) या सिनेमांमध्ये दिसणार आहेत.
अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन वयाच्या 80 व्या वर्षीही खूप सक्रिय आहेत. टीव्ही शो असो किंवा चित्रपट, अमिताभ सर्वत्र आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांवर छाप पाडत आहेत. आता बिग बी दाक्षिणात्य चित्रपटाच्या प्रोजेक्टमध्ये दमदार भूमिका साकारताना दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते जखमीही झाले होते.
दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोणने बॉलिवूड असो वा साऊथ दीपिका सगळीकडेच तिचा जलवा दाखवते. दीपिकाला ग्लोबल स्टार म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. आता दीपिकाही साऊथ सिनेमांकडे वळली आहे. ती लवकरच प्रभाससोबत प्रोजेक्ट के मध्ये दिसणार आहे.
कियारा अडवाणी
कियारा अडवाणी बॉलिवूडमधील काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांद्वारे चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. आता ही अभिनेत्री लवकरच साऊथ सुपरस्टार रामचरणसोबत सिल्व्हर स्क्रीनवर दिसणार आहे. आगामी गेम चेंजरमध्ये कियारा राम चरणसोबत झळकणार आहे.
जान्हवी कपूर
जान्हवी कपूर बॉलिवूडपासून ओटीटीपर्यंत सगळीकडे, तिचा जलवा दाखवत आहेत. आता अभिनेत्री साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडेही वळली आहे. ती लवकरच ज्युनियर एनटीआरसोबत साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘NTR 30’ असे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.
दिशा पटनी
बॉलिवूडमध्ये आपल्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाणारी दिशा पटनी साऊथमध्ये ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटासोबत सुरिया स्टारर ‘कंगुवा’ या चित्रपटातही दिसणार आहे.