फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : रिॲलिटी टीव्ही शो बिग बॉस 18 चा प्रदर्शित झालेला वीकेंडचा वार खूप मनोरंजक आहे. कारण या आठवड्यात सलमान खान नसून फराह खान खेळाडूंना संबोधित करणार आहे आणि त्यांची क्लास घेताना दिसणार आहे. निर्मात्यांनी एक प्रोमो व्हिडिओ जारी केला आहे ज्यामध्ये फराह खान अप्रत्यक्षपणे करणवीर मेहरा शोसाठी सर्वाधिक टीआरपी आणत असल्याचे संकेत देताना दिसू आले. त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांकडून आणि फराह खानकडून त्याला मेडलही दिले. फराह खानने ज्या प्रकारे करणवीर मेहराचे कौतुक केले आहे, त्यावरून करणवीर मेहरा या सीझनमध्ये बाजी मारणार असल्याचेही मानले जात आहे.
Bigg Boss 18 : बिग बॉसने केली प्रेक्षकांची फसवणूक, या आठवड्यात एव्हिक्शनचे नियम बदलले
कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी करणवीर मेहराला सीझनचा विजेता म्हणायला सुरुवात केली आहे. रोहित शेट्टी होस्ट केलेल्या ‘खतरों के खिलाडी’ शोचा विजेता करणवीर मेहरा हा अशा काही खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी व्हिव्हियन डीसेनाला तगडी स्पर्धा दिली आहे. व्हिव्हियन डिसेना या सीझनमध्ये लाडला नावाने प्रसिद्ध झाला आहे आणि या सीझनमध्ये तो ट्रॉफी आपल्या घरी नेईल असा दावा तो सातत्याने करत आहे. पण हे खरंच होणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्येच मिळेल. पण आता करणवीर मेहराचा खेळ प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे आणि त्याच्या लोकप्रियतेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Farah Khan ne bataya kaise gharwalon ne kar diya pura show focussed on one person. Kya hoga gharwalon ka reaction on her opinion? 🤔
Dekhiye #BiggBoss18 Weekend Ka Vaar Shanivaar aur Ravivaar raat 9.30 baje @ColorsTV aur #JioCinema par. pic.twitter.com/NDr5fmMDSl
— JioCinema (@JioCinema) December 7, 2024
लाल कपड्यांमध्ये शो होस्ट करण्यासाठी पोहोचलेल्या फराह खानने नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “बिग बॉसमध्ये आपले स्वागत आहे, ज्याला बाहेरच्या जगात करणवीर मेहरा शो म्हणूनही ओळखले जात आहे.” फराह खानने हे सांगताच करणने फराह खानला हात जोडून अभिवादन केले. फराह खानने करणवीर मेहराला मेडल पाठवले आणि म्हणाली, “हे पदक करण तुझ्यासाठी आहे. माझ्याकडून आणि तुझ्या सर्व चाहत्यांच्या वतीने, कारण हे संपूर्ण घर तुझ्याभोवती फिरते.” करणचे कौतुक होताना पाहून दिग्विजय आणि इतर स्पर्धक त्याच्याकडे इर्षेने बघत होते.
फराह खान म्हणाली की, तिने याआधी एका खेळाडूला अशा प्रकारे टार्गेट केलेलं पाहिलं होतं आणि त्याने सीझन जिंकला होता. त्या स्पर्धकाचे नाव होते सिद्धार्थ शुक्ला. मात्र, फराह खानने करणवीर मेहराची सिद्धार्थ शुक्लासोबत केलेली तुलना लोकांना आवडली नाही. या मुद्द्यावरून अनेक जण फराह खानला घेरताना दिसले. परंतु अनेक चाहते फराह खानच्या या विधानाला सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस 18 चा विजेता ठरल्याचा इशारा मानत आहेत. सलमान खाननेही करणचे कौतुक केले आहे.