(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
९० च्या दशकात, कुनिका सदानंद ही अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत एक लोकप्रिय चेहरा होती. तिच्या मजबूत सहाय्यक आणि नकारात्मक भूमिकांमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. “बेटा,” “गुमराह,” आणि “खिलाडी” यांसारखे चित्रपट कुणिका सदानंद यांनी केले. तिच्या प्रत्येक चित्रपटामधील तिचे सौंदर्य पाहून अनेक लोक तिचे चाहते होते. अभिनेत्री कुनिका सदानंद सध्या ‘बिग बॉस’ सीझन १९ मध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे. अभिनेत्रीच्या प्रेम प्रकरणाबद्दल तिचा मुलगा अयानने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत, अयानने सांगितले की त्यांच्या नात्याबद्दल त्याला जे माहित होते ते विषारी होते. तो म्हणाला, “मी तिला दिवसभर घरी त्याची गाणी गाताना पाहिले. मी विनोद करत होतो. पण तिला तो एक गायक म्हणून खूप आवडतो. ती अजूनही त्याची गाणी गाते. लोक म्हणतात की हे प्रेम २७ वर्षे चाललं पण प्रत्यक्षात ती म्हणाली की जेव्हा ते घडले तेव्हा ती २७ वर्षांची होती.”
अयानने आई कुनिकाला तिच्या आणि कुमार सानू यांच्याबद्दल विचारलं तेव्हा ती त्याला म्हणाली होती की, “तो माझ्या आयुष्यात खूप महत्वाचा होता. मी त्याला माझा सोलमेट मानत होती. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अशा प्रकारचं प्रेम अनुभवलं पाहिजे. मी खूप टॉक्सिक होते. खूप, खूप टॉक्सिक.”
कुनिका सदानंदनने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात तिच्या वादग्रस्त प्रेमसंबंधांबद्दल बोलताना दिसली. तिने सांगितले की “कुमार सानू विवाहित होता आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना तो त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला होता. त्यावेळी माझे लग्न झाले नव्हते. आम्ही एकत्र राहत होतो. पण नंतर त्याचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते. त्याने मला फसवलं तेव्हा मी त्याला सोडून दिलं.”
BB19 Nominations : नीलमपासून गौरवपर्यंत या सदस्यांवर नाॅमिनेशनची टांगती तलवार, कोणाचा होणार पत्ता कट
याचदरम्यान कुनिका एका मुलाखतीत म्हणाली होती की, ती कुमार सानूच्या पत्नीसारखी होती आणि त्याला तिचा नवरा मानत होती. कुनिकाने सांगितलं “त्याच्या पत्नीने हॉकी स्टिकने माझी गाडी फोडली. ती माझ्या घराबाहेर येऊन ओरडायची. पण मी तिला समजून घेतलं. तिला तिच्या मुलांसाठी पैसे हवे होते आणि ती चुकीची नव्हती. तिने सांगितले की तिला कुमार सानू परत नकोय.” अभिनेत्रीने उटीमध्ये गायकाशी झालेल्या तिच्या पहिल्या भेटीची आठवणही करून दिली. अभिनेत्री कामात बिझी असताना गायक त्याच्या बहिणी आणि पुतण्यासोबत सुट्टीसाठी उटीला आला होता. त्यांच्या पहिल्या भेटीनंतर दोघेही जवळचे मित्र बनले.
तिने पुढे असंही सांगितलं की, त्यावेळी कुमार सानू त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कठीण काळातून जात होता. त्याने हॉटेलच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. अभिनेत्रीसह त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला खिडकीच्या कड्यावरून खाली खेचले. जेव्हा तो त्याच्या वेदनांबद्दल बोलला तेव्हा तिने त्याला मिठी मारली. या घटनेने तिला आणि कुमार सानूला आणखी जवळ आणले.