Pakistan Army: शहबाज शरीफ सनकले! असीम मुनीरच्या सैन्याने केला पाकिस्तानी लोकांवरच बॉम्बहल्ला; ३० हून अधिक मृत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मते दारा गावात पाकिस्तानी सैन्याच्या हवाई हल्ल्यात ३० हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी.
जेएफ-१७ थंडर लढाऊ विमानांतून आठ एलएस-६ बॉम्ब टाकल्याची माहिती; मृतांमध्ये महिला व मुलांचाही समावेश.
स्थानिक आमदार व नागरिकांचा संताप, सैन्य दहशतवाद्यांना आश्रय देते, पण निरपराध लोकांवरच बॉम्बवर्षाव करते.
JF-17 Thunder Pakistan launch LS6 bombs : पाकिस्तानात पुन्हा एकदा निरपराध जनतेच्या रक्ताने शोककळा पसरली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मते दारा गावात पाकिस्तानी सैन्याने स्वतःच्या नागरिकांवर हवाई हल्ला करत ३० हून अधिक नागरिकांचा बळी घेतला. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश असल्याने ही घटना आणखी हृदयद्रावक ठरली आहे.
ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. तिराह खोऱ्यातील सीमावर्ती मते दारा गावावर पाकिस्तानी सैन्याने अचानक बॉम्बवर्षाव केला. रात्री दोनच्या सुमारास नागरिक गाढ झोपेत असतानाच जेएफ-१७ थंडर या चिनी लढाऊ विमानांतून आठ एलएस-६ बॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यात नागरिकांच्या घरे उद्ध्वस्त झाली, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
पाकिस्तानी सैन्याने हा हल्ला “ऑपरेशन”चा भाग असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या लपण्याच्या ठिकाणांवर करण्यात आला. परंतु स्थानिकांच्या मते, हल्ल्याचा बळी फक्त सामान्य जनता ठरली. दहशतवाद्यांऐवजी निरपराध लोकांच्या घरांवर बॉम्बवर्षाव केल्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याची खरी निष्ठा पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.
हे देखील वाचा : Shardiya Navratri: ‘याच’ पर्वतावर देवी भवानीने केला होता महिषासुराचा वध; आजही केली जाते ‘या’ ठिकाणी त्या राक्षसाची पूजा
स्थानिक आमदार इक्बाल आफ्रिदी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला. त्यांनी आपल्या फेसबुकवर लिहिले, “वाडी तिरह अकाखेल येथे झालेल्या बॉम्बफेकीत निरपराध महिला व लहान मुलांचा बळी गेला. हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध आहे. कितीही निषेध केला तरी तो कमीच आहे.”
ही घटना पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणाचे जिवंत उदाहरण मानली जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी हाच प्रांत खैबर पख्तूनख्वा इथे जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनेला अधिकृत पोलिस संरक्षणाखाली भरती मोहीम राबवण्याची मोकळीक देण्यात आली होती. सरकार व सैन्य या संघटनांना आश्रय देतात, त्यांना पोसतात, मात्र त्यांच्या स्वतःच्या नागरिकांवर अमानुष बॉम्बहल्ले करतात.
🚨 #BRAKING
Pakistani Air Force JF-17 jets reportedly bombed villages in Tirah Valley, Khyber Pass (disputed KPK), targeting Pashtun civilians.
➡️ Over 20 killed
➡️ At least 8 LS-6 bombs dropped
➡️ Massive destruction in civilian areas#Faith pic.twitter.com/nWmwwxpLq1— Global__Perspective (@Global__persp1) September 22, 2025
credit : social media
या घटनेनंतर खैबर पख्तूनख्वा प्रदेशात तीव्र असंतोष पसरला आहे. नागरिकांना प्रश्न पडला आहे की “दहशतवाद्यांवर कारवाई करण्याच्या नावाखाली आमच्या घरांवर बॉम्ब का टाकले जात आहेत?” अनेक स्थानिक रहिवाशांनी हे हल्ले ‘मानवतेविरुद्धचा गुन्हा’ असल्याचे म्हटले आहे.
जगभरात दहशतवादाचे पोषण करण्याचे आरोप झेलणारे पाकिस्तानी सैन्य आता स्वतःच्या नागरिकांच्या जीवाशी खेळताना दिसत आहे. एका बाजूला ते दहशतवाद्यांना शस्त्रे, प्रशिक्षण व संरक्षण देतात, दुसऱ्या बाजूला निरपराध महिलांवर, मुलांवर व शेतकरी कुटुंबांवर बॉम्ब टाकतात. अशा प्रकारे पाकिस्तान सरकार व सैन्य दहशतवादाचे जनक असून मानवतेचे सर्वात मोठे शत्रू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-India ties : भारत- अमेरिका संबंध निर्णायक टप्यावर; एस. जयशंकर-मार्को रुबियो आज आमनेसामने; काय अजेंडा?
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची अचूक संख्या अजून स्पष्ट नाही. परंतु प्राथमिक आकडेवारीनुसार ३० पेक्षा जास्त नागरिक मृत झाले आहेत, ज्यामध्ये अनेक लहान मुले व महिला आहेत. काही कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. बचाव कार्य अद्याप सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सैन्याचे असे हल्ले पाकिस्तानच्या भविष्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. दहशतवाद्यांना मोकळे रान देणारा व स्वतःच्या नागरिकांना मारणारा देश आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीच विश्वासार्ह ठरणार नाही. आज पाकिस्तानातील नागरिकच विचारत आहेत – “आमचे शत्रू कोण? दहशतवादी की आमचेच सैन्य?” खैबर पख्तूनख्वातील हल्ला हा केवळ एका गावाचा नाही, तर संपूर्ण पाकिस्तानच्या नागरिकांचा शोक आहे. असीम मुनीरच्या आदेशाने घडवलेली ही कारवाई हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणामुळे निरपराध जनता जीव गमावत आहे. हा हल्ला केवळ सैन्याच्या निर्दयतेचा पुरावा नाही, तर इस्लामाबाद व रावळपिंडीतील सत्ताधीश दहशतवादाचे खरे पालक असल्याचा ठोस पुरावा आहे.