शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभर शिंदे गटाने आंदोलनाचा धडाका उडवला होता. आता पुन्हा एकदा राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटले आहे.राऊत यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार राजन विचारे यांचे पाय धुवून ते पाणी प्यावे, असे वक्तव्य केले.यावर प्रतिक्रिया देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोरदार पलटवार केला आहे.सरनाईक म्हणाले, “विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणूनच ते खासदार झाले. एवढेच नाही, येत्या महानगरपालिका निवडणुकीत जिंकून दाखवा, असे आव्हान सरनाईक यांनी राजन विचारेंना दिले.या घडामोडींमुळे आगामी मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट व ठाकरे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.