फोटो सौजन्य - Social Media
डिसेंबरच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा 2’ या तेलुगु चित्रपटाचे यश महिनाअखेरीसही जबरदस्त चालताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. आगामी काळातही ते जागतिक स्तरावर बाहुबली 2 च्या एकूण कलेक्शनला सहज मागे टाकू शकते. या चित्रपटाने भारतात सर्वाधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर चित्रपटगृहांमध्येही मुफासाची जादू पाहायला मिळत आहे. पुष्पा 2 च्या वादळातही हा हॉलिवूडपट मजबूत उभा आहे. मात्र, वरुण धवनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या बेबी जॉनने काही कमाल दाखवली नाही. सोमवारी कोणत्या चित्रपटाने किती कमाई केली हे जाणून घेऊयात.
बेबी जॉन चित्रपटाची कमाई
वरुण धवनचा बेबी जॉन हा चित्रपट आता फ्लॉप ठरला आहे. सुमारे 180-185 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात जॅकी श्रॉफ खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. इतकं सगळं असूनही हा चित्रपट आतापर्यंत चांगला व्यवसाय करण्याच्या मार्गावर आला नाही आहे. पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरला आहे. सहाव्या दिवशी चित्रपटाने 1 कोटी 85 लाखांची कमाई केली आहे. चित्रपटाची एकूण कमाई आता 30.50 कोटींवर पोहोचली आहे.
वरुणला सहा वर्षांत एकही हिट चित्रपट देता आला नाही
आश्चर्याची गोष्ट म्हणजे वरुणला गेल्या सहा वर्षांत एकही हिट चित्रपट देता आलेला नाही. त्याचे भेडिया आणि जुग्जुग जिओ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी होते. त्याच वेळी स्ट्रीट डान्सर 3D आणि कलंक चित्रपट फ्लॉप घोषित करण्यात आले. आता त्यांचा ‘बेबी जॉन’ही फ्लॉपच्या श्रेणीत आले आहे. या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे.
मुफासाचे झाले जबरदस्त केलेशन
मुफासा द लायन किंगचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. हा चित्रपट यावर्षी हॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2024 मध्ये, Deadpool & Wolverine ने भारतात 136.15 कोटी रुपये जमा केले. मुफासा द लायन किंगबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या सोमवारी या चित्रपटाने ५ कोटी ४० लाखांचा व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता 107.1 कोटींवर पोहोचली आहे.
Hina Khan : कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची नवीन पोस्ट पाहून चाहते भावूक
पुष्पा द रुलचा दबदबा कायम आहे.
पुष्पा २ चित्रपटाचा चौथ्या आठवड्यातही धबधबा कायम आहे. या चित्रपटाने आतापर्यंत तिकीट खिडकीवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटाचे चौथ्या सोमवारी 6 कोटी 65 लाख रुपये जमा झाले. हे बेबी जॉनच्या कमाईपेक्षा खूप जास्त आहे. भारतातील चित्रपटाचा एकूण व्यवसाय 1163.65 कोटींवर पोहोचला आहे. येत्या आठवड्यात हा चित्रपट 1200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करू शकतो, असे मानले जात आहे.