(फोटो सौजन्य-Social Media)
तेगुलू सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा देवरा हा नवीनतम चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये जोरदार हाईप आहे. ज्याचा अंदाज चित्रपटाच्या बंपर ॲडव्हान्स बुकिंगवरून सहज लावता येतो. आता प्रश्न उपस्थित होत आहे की एवढ्या मोठ्या ऍडव्हान्स बुकिंगनंतर देवरा पार्ट-1 रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
देवरा पहिल्या दिवशी इतके कोटी कमावणार आहे
देवरा चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंग तिकीट खिडक्या काही दिवसांपूर्वीच सुरु करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून देवरा पार्ट 1 ची तिकिटे वेगाने विकली गेली आहेत. देवरा तिकीट विक्रीमध्ये 12 लाख 27 हजार 261 तिकिटांचे बुकिंग झाले आहे. हे आकडे सर्व भाषांमधील शोसाठी आधार आहेत. या अंतर्गत देवराचे आतापर्यंतचे एकूण प्री-रिलीज उत्पन्न 31 कोटींवर पोहोचले आहे. देवरा च्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, जूनियर एनटीआरचा हा चित्रपट पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये मिळून १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करू शकतो. तथापि, हे फक्त अंदाज आहेत, ज्यामध्ये बदलाची पूर्ण शक्यता आहे.
दिग्दर्शक कोरटाला शिवा यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सैफची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा- Bigg Boss Marathi : निक्कीच्या आईने केला अरबाजच्या साखरपुड्याचा खुलासा, संतापून अभिनेत्रीने फेकले कपडे
ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे
देवरा चित्रपटात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून, त्याचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. येत्या २७ सप्टेंबरला म्हणजेच आज हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. RRR नंतर Jr NTR चा हा पुढचा सिनेमा असल्याची माहिती आहे.