(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांत १४५ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांव्यतिरिक्त, बॉलिवूड सेलिब्रिटींकडूनही या चित्रपटाचे खूप कौतुक होताना देखील दिसत आहे. तसेच जिथे अलीकडेच आयुष्मान खुरानाने या पीरियड ड्रामाला उत्कृष्ट म्हटले होते. आता करण जोहरनेही चित्रपटाचे कौतुक करताना काही शब्द बोलले आहेत. आणि अभिनेता विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांचं कौतुक केले आहे.
करण जोहरने विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचे केले कौतुक
करण जोहरने इंस्टाग्राम स्टोरीवर ‘छावा’ चा एक जबरदस्त पोस्टर शेअर केला आहे. यासोबतच अभिनेत्याने लिहिले की, “छावा” एका अविस्मरणीय आणि भावनिकदृष्ट्या भारलेल्या अभिनयासह एका दमदार चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशाबद्दल अभिनंदन मी करत आहे.” मुख्य कलाकारांचे कौतुक करताना आणि निर्मात्यांचे अभिनंदन करताना, करण म्हणाला, “विकी कौशल हा हुशार आहे आणि त्याचा जबरदस्त अभिनय प्रत्येक फ्रेममध्ये दिसून येतो आहे. अक्षय खन्ना हा आदर्श आहे. दिनू, लक्ष्मण आणि सर्व maddockfilms चे अभिनंदन.’ असे लिहून करण जोहरने सगळ्यांचे कौतुक केले आहे.
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
छावाबद्दल कतरिना कैफने देखील मांडले मत
अलीकडेच, कतरिना कैफने तिचा पती विकी कौशलच्या “छावा” चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला. त्यांनी लिहिले, “ या चित्रपटसृष्टीतील अनुभव आणि छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव जिवंत करण्याचे काम किती उत्तम केले आहे. लक्ष्मण उतेकर यांनी ही अविश्वसनीय कथा अतिशय उत्तम पद्धतीने सांगितली आहे. आणि प्रेक्षकांपर्येन्त पोहचवली आहे. चित्रपटातील शेवटचे ४० मिनिटे तुम्हाला थक्क करतील. विकी कौशलचा अभिनय जबरदस्त आहे. तो जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा तेव्हा त्याच्यावरून नजर हटवणे कठीण आहे.” असे अभिनेत्रीने सांगितले आहे.
‘छावा’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला
छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी सांगणारा आहे. ज्यांची भूमिका अभिनेता विकी कौशलने साकारली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना ही येशुबाई भोसले (संभाजी महाराजांची पत्नी) आणि अक्षय खन्ना ही मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि आतापर्यंत त्याने १४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. आणि तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.