(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती आहे. या निमित्ताने, ऋषभ शेट्टीच्या आगामी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. या नवीन पोस्टरमध्ये, वीर शिवाजीच्या भूमिकेत ऋषभ शेट्टी देवी मातेच्या एका मोठ्या पुतळ्यासमोर उभा असल्याचे दिसून येत आहे. या पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत. तसेच या पोस्टरला चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.
Chhava: इरशाद कामिलने अंगावर शहारे आणणारे लिहिले डायलॉग, परंतु चित्रपटासाठी एकही रुपया घेतला नाही?
ऋषभ शेट्टी साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका
बॉलिवूडपासून ते मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत अनेक स्टार्स शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसले आहेत. आता ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ‘द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ या आगामी चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. ज्याला चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित होणार आहे.
ऋषभ शेट्टीने शेअर केली गोष्ट
पोस्टर रिलीज प्रसंगी ऋषभ शेट्टी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना अभिमान वाटतो. ते केवळ एक योद्धा नव्हते तर स्वराज्याचे आत्मा होते. त्यांना नेहमीच संयम, शहाणपण आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यांचा जीवनप्रवास पडद्यावर दाखवणे माझ्यासाठी खरोखरच खूप खास क्षण आहे. मला आशा आहे की मी त्यांचा वारसा पडद्यावर चांगल्या प्रकारे मांडू शकेन. जेणेकरून सर्व भारतीयांना त्याच्या अमर शौर्याची जाणीव होईल.’ असे अभिनेता म्हणाला आहे.
Chhaava: ‘छावा’ने सिनेमागृहात मिळवला ताबा; बॉक्स ऑफिसवर मंगळवारी केली धमाकेदार कमाई!
चित्रपटात दिसतील हे स्टार्स
स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निर्मात्यांनी या चित्रपटाच्या टीमबद्दलही माहिती दिली आहे. चित्रपटाची कथा सिद्धार्थ-गरिमा यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले आहे. या गाण्यांचे बोल प्रसून जोशी यांनी लिहिले आहेत. तर, छायांकन रवी वर्मन यांनी केले आहे. गणेश हेगडे यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी केले आहे. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी हिंदी आणि इतर सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतात आणि परदेशातही शिवाजी महाराजांचे ‘स्वराज्य’चे स्वप्न दाखवणार आहे.