(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जगभरातील प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ‘डोरेमॉन’ या लोकप्रिय ॲनिमेशन मालिकेचे दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फुफ्फुसाच्या कर्करोगा त्यांनी झुंज दिल्यानंतर ६ मार्च २०२६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती त्यांनी सह-स्थापना केलेल्या ‘अजिया-दो ॲनिमेशन वर्क्स’ या स्टुडिओने १७ मार्च रोजी जाहीर केली. कुटुंबाच्या इच्छेनुसार, त्यांचे अंत्यसंस्कार अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडले आहे.
राम चरणच्या ‘Peddi’च्या सेटवर क्रिकेटपटू तिलक वर्माची भेट; अभिनेत्याने बॅटवर दिला ऑटोग्राफ
शिबायामा त्सुतोमू यांनी जवळपास दोन दशके ‘डोरेमॉन’ मालिकेचे दिग्दर्शन करत या शोला अभूतपूर्व लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यांच्या कुशल दिग्दर्शनामुळे ‘डोरेमॉन’ केवळ एक मुलांचा कार्यक्रम न राहता प्रत्येक पिढीच्या भावविश्वाचा भाग बनला. १९७९ मध्ये त्यांनी ‘डोरेमॉन’च्या टीव्ही मालिकेचे दिग्दर्शन सुरू केले आणि पुढे या फ्रँचायझीमधील तब्बल २२ चित्रपटांचे दिग्दर्शन करत त्यांनी ॲनिमेशन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली.
जपानमध्ये त्यांना अनेकदा ‘राष्ट्रीय ॲनिमेशनचे जनक’ म्हणून गौरवले जात असे. त्यांच्या कामामुळे ॲनिमेशनकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्यांच्या कथाकथनशैलीत साधेपणा, भावना आणि कल्पनाशक्तीचा सुंदर मिलाफ दिसून येत असे, ज्यामुळे ‘डोरेमॉन’सारखी मालिका आजही तितकीच लोकप्रिय आहे.
कसा आहे Dhurandhar 2 ? तिकीटासाठी मोठी रक्कम खर्च करण्याआधी जाणून घ्या Movie Review
१९६३ मध्ये त्यांनी टोई ॲनिमेशनमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शिन-एई ॲनिमेशनसोबतही काम करत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये योगदान दिले आहे. ‘डोरेमॉन’व्यतिरिक्त ‘ल्युपिन III’ आणि ‘चिबी मारुको-चान’ यांसारख्या गाजलेल्या ॲनिमेशन प्रकल्पांमध्येही त्यांचा सहभाग होता, ज्यामुळे ते ॲनिमेशन क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व ठरले आहे.
शिबायामा त्सुतोमू यांच्या निधनामुळे ॲनिमेशन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी निर्माण केलेल्या कथा, पात्रे आणि आठवणी आजही लाखो लोकांच्या बालपणाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या कामाचा ठसा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत कायम राहणार आहे.






