Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Heavy Rain: मुंबईच्या मुसळधार पावसाचा ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीलाही फटका; घरात शिरलं पाणी,VIDEO शेअर करत दाखवली परिस्थिती

मुंबईतील मुसळधार पावसाचा सर्वसामान्यांसह अभिनेत्री अशनूर कौरलाही बसला आहे. तिच्या घरात पाणी शिरल्याचा VIDEO तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 02, 2026 | 03:11 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील मुसळधार पावसाचा सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनाही फटका
  • अभिनेत्री अशनूर कौरच्या घरात शिरले पाणी
  • व्हिडिओ शेअर दाखवली परिस्थिती
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचा फटका सर्वसामान्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकारांनाही बसत आहे. अभिनेत्री अशनूर कौर हिच्या घरातही पावसाचे पाणी शिरल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्रीने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत घरातील परिस्थिती दाखवली आहे.

अशनूरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या घराच्या बाल्कनीतून पावसाचे पाणी आत शिरल्याचे दिसत आहे. बाल्कनीलगतच्या फरशीवर पाणी साचले असून ते थेट लिव्हिंग रूमपर्यंत पोहोचल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसते. घरात पाणी साचल्याने अभिनेत्रीला मोठा त्रास सहन करावा लागला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांनी अशनूर आणि तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. अनेकांनी कमेंट्सद्वारे ती आणि तिचे कुटुंब सुरक्षित असल्याची आशा व्यक्त केली. मात्र, अशनूरने कोणतीही गंभीर हानी झाल्याचा उल्लेख केलेला नाही.

अशनूरच्या या व्हिडिओमुळे मुसळधार पावसाचा मुंबईकरांना किती मोठा फटका बसत आहे, याची झलक पाहायला मिळाली. बाहेर साचलेले पाणी थेट घरात शिरल्याने अनेक रहिवाशांना अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

Vijaya Mehta : ‘माझी आई, माझी सर्वकाही…’ विजया मेहता यांच्या मृत्यूच्या बातमीने नीना कुलकर्णी झाल्या हळव्या

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडतात. दीर्घकाळ मुसळधार पाऊस झाल्यास रस्ते, निवासी संकुले आणि सार्वजनिक ठिकाणे जलमय होतात. परिणामी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होतो.

Taylor Swift Wedding : हॉलिवूडवाल्यांचा शाहीपणा! आता गायिका टेलरही चढली बोहल्यावर; लग्नाचा बजेट 100 कोटींच्या पार

अशनूर कौर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या अशनूरने २००९ मध्ये ‘झांसी की रानी’ या मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कोई लौट के आया है’, ‘पटियाला बेब्स’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिनयासोबतच अशनूर सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय असून तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. म्युझिक व्हिडिओ आणि विविध रिअॅलिटी शोमधूनही ती कायम चर्चेत असते.

Web Title: Heavy mumbai rains flood ashnoor kaurs home actress shares viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • Ashnoor Kaur
  • Entertainemnt News
  • Mumbai Rain

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.