(फोटो सौजन्य - Instagram)
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा आणि नर्गिस फाखरी यांच्यासह १९ कलाकारांचा कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट ‘हाऊसफुल ५’ ६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे स्टार दिवसरात्र मेहनत घेत आहेत. या संदर्भात १ जून रोजी पुण्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे स्टार पुण्यातील एका मॉलमध्ये पोहोचले जिथे चाहते त्यांना पाहण्यासाठी उपस्थित झाले परंतु चाहत्यांची गर्दी नंतर नियंत्रणाबाहेर गेली. तिथे इतका गोंधळ झाला की अक्षय कुमारला हात जोडून गर्दीत धक्काबुक्की करू नका असे आवाहन करावे लागले. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Race Across the World मधील स्पर्धकाचे निधन, वयाच्या २४ व्या वर्षी भीषण अपघातात गमावला जीव!
स्टारकास्ट पाहून गर्दी नियंत्रणाबाहेर गेली
सेलिब्रिटी फॅन पेजवर काही व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये ‘हाऊसफुल ५’ ची स्टारकास्ट त्यांच्या आगामी ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यातील एका मॉलमध्ये पोहोचल्याचे दिसून येते. अक्षय कुमार इतर स्टार्ससोबत स्टेजवर येताच त्याला पाहण्यासाठी आलेली गर्दी अनियंत्रित झाली, ज्यामुळे सर्व व्यवस्था व्यर्थ ठरली. संपूर्ण मॉल गर्दीने भरलेला दिसत होता. या गर्दीमध्ये चाहते धक्काबुकी करू लागले आणि या धक्काबुकीत अर्धे चाहते रडताना देखील दिसत आहे.
महिला आणि मुली रडू लागल्या
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गर्दीत मुली आणि महिला रडताना दिसत आहेत. गर्दीत अनेक लोक पुढे येण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, गर्दीत एक मुलगी तिच्या कुटुंबापासून वेगळी झाली, त्यानंतर ती स्टेजवर रडताना दिसली. यानंतर जॅकलिन फर्नांडिस तिला हाताळताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
प्रिन्स नरुला आणि युविका चौधरीच्या घरात चोरी, मौल्यवान वस्तू चोरून मोलकरीण फरार!
अक्षय कुमारने केले खास आवाहन
मॉलमध्ये गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून अक्षय कुमारने चाहत्यांना हात जोडून आवाहन केले. तो व्हिडिओमध्ये म्हणतो, ‘मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की इथे महिला आणि मुले आहेत. धक्का देऊ नका. कृपया, मी सर्वांना विनंती करतो.’ त्याच वेळी, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा आणि नर्गिस फाखरी यांच्यासह इतर स्टार तणावात दिसले. यानंतर, मोठ्या कष्टाने गर्दी नियंत्रित करून कार्यक्रम वेळेवर पूर्ण झाला.