Katrina kaif (फोटो सौजन्य -Instagram)
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली कतरिना कैफ आज 16 जुलै रोजी तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त सर्व कलाकार आणि चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच कतरिनाचा नवरा आणि सुपरस्टार विक्की कौशलने देखील तिला हटक्या पद्धतीत शुभेच्छा देताना दिसला आहे. त्याने आपल्या पत्नीसाठी सुंदर नोट लिहून, त्यांचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
विकीने कतरिनावर केला प्रेमाचा वर्षाव
विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलीवूड इंडस्ट्रीतील आवडते जोडपे आहेत. अशा परिस्थितीत, आज कतरिनाचा वाढदिवस आहे आणि विकी शुभेच्छा देणार नाही असे शक्यच नाही आहे. बॅड न्यूज चित्रपटाच्या कलाकाराने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक नवीनतम पोस्ट शेअर केली आहे.
विकीने त्याच्या स्वतःच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करून कतरिनासाठी सुंदर नोट लिहिली आहे. त्याने लिहिले की, “तुझ्यासोबत आठवणी बनवणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास भाग आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिये,” असे लिहून त्याने आपले प्रेम व्यक्त केले आहे.
अश्या प्रकारे विकी कौशलने कतरिना कैफला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला विकी आणि कतरिनाचे अनेक फोटो पाहायला मिळतील. ज्यामध्ये दोघेही क्युट दिसत आहेत. व
कधी झाले विकी आणि कतरिनाचे लग्न
2021 मध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी एकमेकांना कायमचे जीवनसाथी बनवले होते. लग्नाला जवळपास 3 वर्षे झाली आहेत. तसेच विकी आणि कतरिना यांच्यातील प्रेम कमी होत नसून ते आणखी फुलताना दिसून येत आहे.