संग्रहित फोटो
ठाकरे म्हणाले, ‘‘ आम्ही जेव्हा भाजपसाेबत हाेताे, तेव्हा भ्रष्टाचाराच्या विराेधात लढत हाेताे. शिवसैनिकांनी लाठ्या – काठ्या खाल्ल्या. २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर परीस्थितीत बदल हाेईल असे वाटले हाेते. परंतु भाजपने इतर पक्षातील भ्रष्टाचारींना पक्षात प्रवेश देण्यास सुरुवात केली. आज भाजपमध्ये इनकमिंग का सुरु आहे, ते सर्वांना माहीती आहे. भाजपमध्ये सगळे भ्रष्टाचारी जमा झाले आहेत. त्यामुळे इतर पक्ष ‘क्लीन’ झाले असून, भाजपचे वाॅशिंग मशिन खराब हाेऊ लागले आहे.’’
राज्यात राजकीय समताेल राखणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करताना आदीत्य ठाकरे म्हणाले, ‘‘ सध्याचे राज्यातील राजकीय वातावरण आजपर्यंत एवढे कधीच प्रदुषित झाले नव्हते तितके आज झाले आहे. देशभरात ज्या शहरात, राज्यात भाजपची सत्ता आली तेथे प्रगतीचा प्रवास उलट्या दिशेने सुरु झाला आहे. भाजपची सत्ता असलेल्या देशात एक शहर असे दाखवा की जेथे सुधारणा झाली आहे. जेथे त्यांची सत्ता आहे तेथे चिखलच झाला असून, त्यातच त्यांचे कमळ फुलले आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात वेगळे आणि प्रत्यक्षात जमीनीवर काम काहीच नसते. फाेडा आणि राज्य करा हे त्यांचे धाेरण आहे.’’
निवडणूक आयाेग अस्तित्वात आहे की नाही ?
नगरपंचायत आणि नगर परीषदांच्या निवडणुकीतील गैरप्रकारावर बाेलताना ठाकरे यांनी राज्य निवडणुक अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला. सगळीकडे माेठ्या संख्येने बाेगस मतदार सापडत आहेत. तसेच पैशांचा पाऊस पाडला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्ध्या तासाच्या प्रचारासाठी जाताना दाेन दाेन बॅगा घेऊन कशाला जातात? कधी नव्हे ते राज्याचे राजकीय वातावरण प्रदुषित झाले आहे. याला जनतेनेच उत्तर द्यायला हवे आहे,’’ अशी टिकाही त्यांनी केली.






