Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

८ तासांच्या शिफ्ट वादात Kunal Khemu यांचं प्रेग्नन्सीवर विधान; सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

कुणाल केम्मूने आठ तासांच्या कामाच्या शिफ्टबद्दल आपले मत मांडले आहे आणि महिलांच्या प्रेग्नन्सीवर सल्ला दिला आहे. अभिनेत्याच्या आता या विधानावर चाहते आता संतापले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 13, 2026 | 03:48 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ८ तासांच्या शिफ्ट वाद पुन्हा चर्चेत
  • सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप
  • कुणाल केम्मूचे वक्तव्य व्हायरल
 

अभिनेता कुणाल केम्मूने अलीकडेच दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या वर्क शिफ्टच्या मागणीबाबत आता अभिनेत्याने आपले मत मांडले आहे. सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये बोलताना कुणाल केम्मू म्हणाला की, महिलांनी आपल्या प्रेग्नन्सीचं “योग्य नियोजन” करायला हवं. तसेच अधिक मानधन मिळवण्यासोबतच कमी तास काम करण्याची अपेक्षा कोणालाही ठेवता येत नाही, असेही अभिनेत्याने म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आणि नेटकऱ्यांनी आता संताप व्यक्त केला आहे.

“बॉलिवूडपेक्षा जास्त पैसा..”, राजीव अदातिया १० लाख रुपयांमध्ये विकतोय LPG सिलेंडर, पोस्ट करत म्हणाला, ”गॅस विकण्यात…”

निर्माते झाल्यानंतर निर्णय घ्या

सोहा अली खानशी संवाद साधताना कुणाल केम्मू म्हणाला, “तुम्ही स्वतः निर्माता बना, स्वतःचे पैसे गुंतवा, तेव्हा तुम्हीच बॉस असाल. त्यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला फक्त दोन तास काम करायचं आहे की नाही. मात्र दुसऱ्यांच्या पैशांवर असे निर्णय घेणे खूप सोपे असते.” कुणाल केम्मू पुढे म्हणाला, “महिलांकडे एक पर्याय असतो. प्रेग्नन्सीचा सुमारे नऊ महिन्यांचा कालावधी असतो, त्यामुळे त्याची आधीच योजना करता येते. तुम्ही आई होण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच तुम्ही त्यासाठी नियोजन केलेले असते. मात्र तुमच्या नियोजनामुळे जग कसे काम करते त्यावर परिणाम होऊ नये.”

सोशल मीडिया नेटकऱ्यांचा संताप

दरम्यान, त्याच्या या वक्तव्यावर अनेक सोशल मीडिया युजर्सनी टीका केली आहे. काहींनी अभिनेत्याला स्त्रीविरोधी असल्याचे म्हटले. एका युजरने लिहिले, “सोहा अली खान आणि कुणाल खेमू” आम्हाला ‘कपल गोल्स’ वाटायचे, पण हे वक्तव्य स्त्रीविरोधात आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “आम्हाला वाटायचे की ते चांगले आहेत, पण त्यांच्या बोलण्यात महिलांविषयी द्वेष दिसतो आहे.” तर आणखी एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले, “कुणाल नेहमीच मला अपरिपक्व वाटायचे; यावेळी मात्र ते खरे असल्याचे जाणवले.”

“मुंबईत गुदमरतेय…” दीपिका पदुकोणने मुंबईच्या खराब हवेबद्दल व्यक्त केली चिंता; पोस्ट शेअर करत म्हणाली…

नक्की काय म्हणाली दीपिका?

तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोण कधीही सार्वजनिकपणे असे सांगितले नाही की त्या निर्मात्यांकडे आठ तासांच्या कामाच्या शिफ्टची मागणी करत होत्या. मात्र काही अहवालांनुसार, याच मागणीमुळे अभिनेत्रीला ‘स्पिरिट’ आणि ‘कल्की २’ या चित्रपटांमधून बाहेर करण्यात आल्याची चर्चा होती. दीपिकाच्या मते, “आपण जास्त वेळ काम करणे ही सामान्य गोष्ट मानू लागलो आहोत. पण माणसाच्या शरीर आणि मनासाठी दिवसाला आठ तास काम करणे पुरेसे असते.”

 

Web Title: Kunal kemmu slammed for pregnancy remark amid deepikas 8 hour row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Bollywood
  • Deepika Padukone
  • entertainment

संबंधित बातम्या

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर
1

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर

Mirzapur The Movie : थिएटर रिलीजआधीच ‘मिर्झापूर 3’चा धमाका! ‘दो नंबरी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ
2

Mirzapur The Movie : थिएटर रिलीजआधीच ‘मिर्झापूर 3’चा धमाका! ‘दो नंबरी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Deepika Padukone Pregnancy: दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान दीपिका पादुकोणची नवी पोस्ट; व्हिडिओतून सांगितलं दिवसभराचं रुटीन
3

Deepika Padukone Pregnancy: दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान दीपिका पादुकोणची नवी पोस्ट; व्हिडिओतून सांगितलं दिवसभराचं रुटीन

AA23 Allu Arjun: अल्लू अर्जुन-लोकेश कनगराज जोडीचा धमाका! ‘AA23’ मध्ये पाहायला मिळणार आजवरचा सर्वात हटके लूक; सूत्रांचा खुलासा
4

AA23 Allu Arjun: अल्लू अर्जुन-लोकेश कनगराज जोडीचा धमाका! ‘AA23’ मध्ये पाहायला मिळणार आजवरचा सर्वात हटके लूक; सूत्रांचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.