(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमीच आपल्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या चित्रपटांबाबत आणि कामासंदर्भात सतत नवी माहिती समोर येत असते. मात्र यावेळी ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कोणत्याही चित्रपटामुळे नव्हे, तर एका सोशल मीडिया पोस्टमुळे तिची चर्चा रंगली आहे. दीपिकाने मुंबईतील खराब हवा गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली असून, यावर तातडीने कारवाई करण्यासाठी तिने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडेही आवाहन केले आहे.
दीपिका पादुकोणने गुरुवारी तिच्या इन्स्टाग्रामवर एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) चा स्क्रीनशॉट शेअर केला. या स्क्रीनशॉटमध्ये मुंबईतील अनेक भागांमध्ये वाढलेले प्रदूषण दिसत असल्याने अभिनेत्रीने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. “हे शहर आणि इथे राहणारे लोक श्वास गुदमरत आहे. हे कसं योग्य आहे?” असे अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच अभिनेत्रीने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ला देखील या पोस्टमध्ये मेंशन केले आहे. यापूर्वीही या मुद्द्यावर सैयामी खेर आणि रिचा चड्डा यांनीही चिंता व्यक्त केली होती.

(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
दीपिका पादुकोण पोस्ट चर्चेत
दरम्यान, दीपिका पादुकोण यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दीपिका बॉलीवूडमधील मोठं नाव असल्याने तिच्या कोणत्याही पोस्टला चाहत्यांकडून त्वरित प्रतिसाद मिळतो आणि ती काही क्षणांतच व्हायरल होते. प्रोफेशनल आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर दीपिका गेली जवळपास १९ वर्षे बॉलीवूडमध्ये कार्यरत आहेत. २००७ साली त्यांनी शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट देत बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
‘Main Wapas Aaunga’चा टीझर रिलीज; Diljit Dosanjh सोबत ‘या’ अभिनेत्रीने घेतली एन्ट्री
दीपिका पादुकोणचे आगामी चित्रपट
दीपिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ती अॅटली दिग्दर्शित एका शीर्षक नसलेल्या चित्रपटाचा भाग आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. अल्लू अर्जुनचा वाढदिवस ८ एप्रिल रोजी आहे. असे मानले जाते की निर्माते त्याच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचे शीर्षक जाहीर करतील. याव्यतिरिक्त, दीपिका या वर्षी शाहरुख खानसोबत “किंग” नावाच्या चित्रपटात दिसणार आहे, जो २४ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करत आहेत.






