Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur The Movie : थिएटर रिलीजआधीच ‘मिर्झापूर 3’चा धमाका! ‘दो नंबरी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mirzapur The Movie : भारतीय सिनेसृष्टीतील बहुप्रतिक्षित 'मिर्झापूर: द मूव्ही' या चित्रपटाचे पहिले गाणे 'दो नंबरी' नुकतेच प्रदर्शित झाले आहे. प्रसिद्ध हरियाणवी रॅपर धांडा न्योलीवाला याने या गाण्याद्वारे बॉलिवूडमध्ये गायक, संगीतकार म्हणून पदार्पण केले असून त्याच्या दमदार बीट्सने रसिकांना भुरळ पाडली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 03, 2026 | 05:02 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • थिएटर रिलीजआधीच मोठा धमाका!
  • ‘दो नंबरी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ
  • चित्रपट कधी होणार रिलीज?
Mirzapur The Movie : भारतीय सिनेसृष्टीतील बहुप्रतिक्षित ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ( Mirzapur The Movie ) या चित्रपटाची चाहते बरीच वाट पाहतं आहे. या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला. त्याला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर आता ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा अधिकृत ट्रेलर ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं गाणं ‘दो नंबरी’ प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचा क्रेझ सध्या सोशल मीडियावर चांगलाचा पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी याचा क्रेझ बराच वाढत आहे.

Excel Music Launch: रितेश सिधवानी-फरहान अख्तर यांची मोठी घोषणा; ‘Excel Music’च्या माध्यमातून संगीतविश्वात नवी इनिंग

हरियाणवी रॅपर धांडा न्योलीवालाचं गाणं

अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट मिर्झापूर: द मूव्हीशी संबंधित प्रत्येक नव्या अपडेटद्वारे चाहत्यांचा उत्साह सतत वाढवत आहेत. आता निर्मात्यांनी चित्रपटातील पहिल्या गाण्याची दो नंबरी’ घोषणा केली असून, हे गाणे उद्या रिलीज होणार आहे. हे गाणे प्रसिद्ध हरियाणवी रॅपर धांडा न्योलीवाला यांनी गायले, लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे. विशेष म्हणजे, या गाण्याद्वारे धांडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. दमदार हरियाणवी बीट्स आणि जबरदस्त एनर्जीने भरलेले हे गाणे मिर्झापूरच्या बेधडक आणि दमदार विश्वाची झलक देण्याचे वचन देते. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हा ट्रॅक त्याच्या वाढत्या क्रेझमध्ये आणखी भर घालण्यासाठी सज्ज आहे.

भव्य ट्रेलर लॉन्चबद्दलची उत्सुकता आणखी वाढली

एक्सेल म्युझिकच्या पहिल्या गाण्या ‘दो नंबरी’च्या रिलीजबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य ट्रेलर लॉन्चची उत्सुकताही आणखी वाढली आहे. टीझरला मिळालेल्या शानदार प्रतिसादानंतर निर्माते प्रत्येक नव्या अपडेटसह प्रेक्षकांची उत्सुकता सातत्याने वाढवत आहेत, त्यामुळे प्रत्येक नवा खुलासा आधीपेक्षाही अधिक मोठा आणि दमदार ठरत आहे.

सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक

मिर्झापूर: द मूव्ही सध्या भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक बनला आहे. पहिल्यांदाच ही सुपरहिट फ्रँचायझी मोठ्या पडद्यावर येत असून, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अली फझल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ड्रामा, सत्तेची लढाई आणि ‘भौकाल’च्या नव्या पर्वाचे वचन देतो. या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगांवकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी आणि सोनल एस. चौहान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हे सर्व कलाकार मिळून या फ्रँचायझीच्या नव्या अध्यायाला अधिक भव्य आणि दमदार बनवणार आहेत.

कधी होणार प्रदर्शित?

मिर्झापूर: द मूव्हीची प्रस्तुती अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले असून, कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे सह-निर्माते आहेत. हा चित्रपट 4 सप्टेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tumbadchi Manjula OTT Release: ‘तुंबाडची मंजुळा’चा ZEE5 वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर; ‘या’ दिवसापासून पाहता येणार ब्लॉकबस्टर चित्रपट

Web Title: Mirzapur the movie first song do nambari released dhanda nyoliwala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • amazon prime video
  • Bollywood
  • Hindi Movie
  • Marathi News
  • Mirzapur
  • Pankaj Tripathi
  • Web Series

संबंधित बातम्या

Whatsapp New Scam: WhatsApp वरून येतोय धोका! ओळखीच्या माणसाकडून फाईल आली तरी जपून उघडा
1

Whatsapp New Scam: WhatsApp वरून येतोय धोका! ओळखीच्या माणसाकडून फाईल आली तरी जपून उघडा

Lifestyle News: काळीकुट्ट पडलेली पितळेची भांडी २ मिनिटात करा चकचकीत, सोप्या टिप्स जाणून घ्या…
2

Lifestyle News: काळीकुट्ट पडलेली पितळेची भांडी २ मिनिटात करा चकचकीत, सोप्या टिप्स जाणून घ्या…

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
3

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Hanuman Ansh Box Office Collection: ‘हनुमान अंश’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; 2 कोटींच्या बजेटमध्ये वर्ल्डवाइड 300 कोटींची कमाई
4

Hanuman Ansh Box Office Collection: ‘हनुमान अंश’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; 2 कोटींच्या बजेटमध्ये वर्ल्डवाइड 300 कोटींची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.