Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मातृभूमि’ मधील ‘चांद देख लेना’ गाणं रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदा सिंहच्या केमिस्ट्रीने वेधले लक्ष

सलमान खानचा आगामी ‘मातृभूमि’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पोस्टर रिलीजनंतर आता या चित्रपटामधील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ज्यामधील सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 19, 2026 | 01:04 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘मातृभूमि’ मधील ‘चांद देख लेना’ गाणं रिलीज
  • सलमान खान आणि चित्रांगदा सिंहची दिसली केमिस्ट्री
  • ‘मातृभूमि’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

ईदच्या खास मुहूर्तावर सलमान खानने आपल्या चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. सलमान खान फिल्म्सच्या ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातील “चांद देख लेना” हे भावनिक गाणं नुकतंच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांची प्रेम, प्रतीक्षा आणि भावनांची नाजूक केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. या दोघांना एकत्र पाहून चाहते देखील खुश झाले आहेत. अशातच त्यांचे नवीन गाणे सोशल मीडियावर गाजत आहे.

“चांद देख लेना” हे गाणं चंद्राच्या प्रतीकातून भावना व्यक्त करतं आहे. ईदमध्ये चंद्र दर्शन आनंद आणि सणाचं प्रतीक असतं, तर करवा चौथमध्ये तो प्रेम, विश्वास आणि प्रतीक्षेचं प्रतिक मानलं जातं. या दोन्ही परंपरांना एकत्र गुंफत हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणार आहे. या आधी चित्रपटातील “मातृभूमि” या टायटल ट्रॅकला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून त्याला ५० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर व्हॅलेंटाईन डे निमित्त “मैं हूँ” हे गाणं रिलीज झाले. आता “चांद देख लेना”मुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘स्वॅगसोबत देशभक्ती…’ ‘धुरंधर 2’ पाहून Allu Arjun झाला थक्क; रणवीर सिंगचे केले तोंडभरून कौतुक

या गाण्याला हिमेश रेशमिया यांनी संगीत दिलं असून, त्यात जुन्या आणि खऱ्या प्रेमाची आठवण जागवणारी भावनिक धून आहे. गाण्यात एका सैनिकाच्या कर्तव्य आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील भावनिक संघर्ष अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. व्हिडिओमध्ये चित्रांगदा सिंग यांनी सैनिकाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे, जी सीमारेषेवर तैनात असलेल्या आपल्या पतीची आतुरतेने वाट पाहते. हे गाणं देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबांच्या भावनांना सलाम करते.

 

विशेष म्हणजे, या गाण्यातून नव्या टॅलेंटलाही संधी देण्यात आली आहे. “चांद देख लेना” हे गाणं युवा गायक निहाल टौरो आणि अंकोना मुखर्जी यांनी गायले आहे, जे याआधी भजन आणि कीर्तनासाठी ओळखले जात होते. पूर्वी ‘बॅटल ऑफ गलवान’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाचं नाव आता ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ असं करण्यात आले आहे. या बदलामागे युद्धाच्या पार्श्वभूमीवर मानवी भावना आणि संवेदनशीलतेचा संदेश अधिक प्रभावीपणे मांडण्याचा उद्देश करण्यात आला आहे.

‘Doraemon’ दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमु यांचे निधन; ‘या’ गंभीर आजारामुळे वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली सलमान खान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अपूर्व लिखिया यांनी दिग्दर्शन केलं आहे. शौर्य, त्याग आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भावनिक अनुभव ठरणार आहे.

Web Title: Maatrubhumi song chand dekh lena salman khan romances chitrangda singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Salman Khan: तमन्ना भाटियाचा आवाज ऐकून सलमान खान भारावला; ‘बिग बॉस २०’मध्ये केलं भरभरून कौतुक
1

Salman Khan: तमन्ना भाटियाचा आवाज ऐकून सलमान खान भारावला; ‘बिग बॉस २०’मध्ये केलं भरभरून कौतुक

Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग
2

Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
3

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.